अंबरनाथमधील ‘त्या’ तरुणाच्या हत्येचे गूढ अखेर उलगडले; मित्रानेच केली मित्राची हत्या, आरोपीला अटक

अंबरनाथ शहरात एका तरुणाची डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आली होती. या हत्येचा पोलिसांनी काही तासांतच उलगडा करत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

अंबरनाथमधील 'त्या' तरुणाच्या हत्येचे गूढ अखेर उलगडले; मित्रानेच केली मित्राची हत्या, आरोपीला अटक
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Jan 02, 2022 | 8:39 PM

ठाणे : अंबरनाथ शहरात एका तरुणाची डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आली होती. या हत्येचा पोलिसांनी काही तासांतच उलगडा करत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. कंपनीत लेबर कॉन्ट्रॅक्ट घेण्याच्या वादातून ही हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. समीर आसिफ मोमीन असे या प्रकरणातील आरोपीचे नाव असून, त्याला अटक करण्यात आली आहे. तर रवी तिवारी असे मृत तरुणाचे नाव आहे.

‘असा’ झाला हत्येचा उलगडा

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, अंबरनाथ शहरातील पश्चिम भागात असलेल्या वूलन मिल कंपाउंडमध्ये आज एका अज्ञात तरुणाचा दगडाने डोकं ठेचलेला मृतदेह आढळून आला होता. या तरुणाची ओळख पटवली असता त्याचं नाव रवी तिवारी असल्याचं समोर आलं. यानंतर रवी याचा पत्ता शोधत तो काल रात्री कुणासोबत होता, याची माहिती पोलिसांनी घेतली. त्यानुसार पोलिसांनी समीर आसिफ मोमीन या तरुणाला ताब्यात घेतलं. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने आपणच ही हत्या केल्याची कबूली दिली आहे.

…म्हणून केली हत्या

मयत तरुण रवी तिवारी आणि आरोपी समीर आसिफ मोमीन यांच्यात एका कंपनीत लेबर कॉट्रॅक्ट घेण्यावरून अनेकदा वाद झाले होते. काल समीर हा मयत रवी याला दारू पिण्यासाठी म्हणून वूलन मिल कंपाउंडच्या मैदानात घेऊन आला. तिथे समीर याने रवीला भरपूर दारू पाजली, रवी हा दारूच्या नशेत असताना आरोपीने त्याच्या डोक्यात दगड घातला. घाव वर्मी बसल्याने रवीचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला होता, अखेर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. दरम्यान समीर याला उद्या न्यायालयात हजर केलं जाणार असून, या हत्येत त्याच्यासोबत आणखी कुणी सहभागी होतं का? याचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

संबंधित बातम्या

समीर वानखेडे यांचा गोव्यात कारवाईचा धडाका, एनसीबीकडून दोन महिलांना अटक

Video | ‘दुसऱ्याच्या इज्जतीचा तुम्हाला काही फरक पडत नाय म्हणजे काय?’ भाजप आमदार भडकले!

चारित्र्याच्या संशयातून पतीने काढला पत्नीचा काटा; पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.