West Bengal Triple Death: कूचबिहारमध्ये एकाच कुटुंबातील तिघांचा रहस्यमयरित्या मृत्यू, हत्या की आत्महत्या? याबाबत तपास सुरु

उत्पल बर्मन असे या शिक्षकाचे नाव आहे. बर्मन हे कूचबिहारच्या एबीएन शील कॉलेजमध्ये कॉन्ट्रॅक्टवर शिक्षक होते. आपल्या पत्नी आणि मुलासह ते कूचबिहार येथे भाड्याच्या घरात राहत होते.

West Bengal Triple Death: कूचबिहारमध्ये एकाच कुटुंबातील तिघांचा रहस्यमयरित्या मृत्यू, हत्या की आत्महत्या? याबाबत तपास सुरु
कूचबिहारमध्ये एकाच कुटुंबातील तिघांचा रहस्यमयरित्या मृत्यू
Follow us
| Updated on: Nov 18, 2021 | 5:41 PM

पश्चिम बंगाल : पश्चिम बंगलामधील कूचबिहारमध्ये गुरुवारी सकाळी महाविद्यालयीन शिक्षकाच्या कुटुंबातील तिघांच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे. महाविद्यालयीन शिक्षकासह त्याच्या पत्नी आणि मुलाचा मृतदेह राहत्या घरात आढळून आला आहे. शिक्षकाचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत सापडला, यावेळी त्याचे हात हेडफोनने बांधलेले होते. त्याच्या पत्नी आणि मुलाचे मृतदेह दुसऱ्या खोलीत आढळून आले. त्यामुळे ही आत्महत्या की हत्या? याचा तपास बंगाल पोलीस करत आहेत.

उत्पल बर्मन असे या शिक्षकाचे नाव आहे. बर्मन हे कूचबिहारच्या एबीएन शील कॉलेजमध्ये कॉन्ट्रॅक्टवर शिक्षक होते. आपल्या पत्नी आणि मुलासह ते कूचबिहार येथे भाड्याच्या घरात राहत होते. त्यांचे मूळ घर गोसानीबारी, दिनहाटा येथे आहे.

मंगळवारपासून घराचा दरवाजा बंद होता

मंगळवारपासून बर्मन यांच्या घराचा दरवाजा बंद होता. गुरुवारपर्यंत घरमालकाला कोणतीही हालचाल न मिळाल्याने त्यांनी दरवाजा ठोठावला. पण प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर पोलीसांना याबाबत कळविण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत खोलीचा दरवाजा उघडला असता एका खोलीत उत्पलचा मृतदेह लटकलेला दिसला. त्याचे हात हेडफोनने बांधलेले होते. त्यांची पत्नी आणि 8 वर्षाच्या मुलाचे मृतदेह दुसऱ्या खोलीत सापडले.

उत्पल बर्मन हे भाड्याच्या घरात राहत होते

38 वर्षीय उत्पल बर्मन हे दिनहाटा येथील गोसानीबारी येथील रहिवासी आहे. ते गुंजाबारी येथे भाड्याच्या घरात राहत होता. त्यांच्या कुटुंबात त्यांची पत्नी अंजना आणि 8 वर्षांचा मुलगा अदृश्य आहेत. कौटुंबिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या मंगळवारी उत्पलचे कुटुंबातील इतर सदस्यांशी फोनवर बोलणे झाले. लवकरच घरी जाणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. दरम्यान, उत्पलने घरमालकाला तशी माहिती दिली.

आत्महत्या की हत्या?

संपूर्ण कुटुंबाने एकत्र आत्महत्या केली की त्यामागे आणखी काही कारण आहे? हात हेडफोनने बांधलेले असल्याने हत्येनंतर उत्पलचा मृतदेह फासावर लटकवण्यात आला का? त्यांची पत्नी आणि मुलाचा मृत्यू कसा झाला? या रहस्यांचा कूचबिहार कोतवाली पोलीस तपास करत आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला. शवविच्छेदन अहवाल येईपर्यंत काही सांगता येणार नसल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. पोलीस पोस्टमार्टम रिपोर्टची वाट पाहत आहेत. (Mysterious death of three members of the same family in Cooch Behar, An investigation is underway)

इतर बातम्या

Crime |दुर्दैवी घटना : भरधाव ट्रकने दुचाकीस्वारांना चिरडले , पती-पत्नीचा जागेवर मृत्यू

स्कूल व्हॅलचालकाची विद्यार्थिनीशी सलगी, आईला सापडला नको त्या अवस्थेत आणि…

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.