Nagpur Crime : नागपुरातील मानवी तस्करीचा भंडाफोड, मुलाल विकलं 3 लाखात, आता पोलिसांनी आवळल्या मुसक्या
तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी केलेल्या तापसाअंती तीन महिलांसह एका दलालाला अटक करण्यात आली आहे, धक्कादायक म्हणजे या प्रकरणात अटक झालेल्या दोन महिला एका रुग्णालययातील परिचारिका आहेत.
नागपूर : नागपुरातील एका महिलेने तीन वर्षांपूर्वी एका मुलाला (Human Trafficking) दलालांच्या मार्फत तीन लाख रुपयांमध्ये (Child Sold) विकत घेतले होते. मात्र, त्याच महिलेच्या मोठ्या मुलाने या प्रकरणाची गुन्हे शाखेकडे तक्रार (Nagpur Police) दाखल केल्यामुळे मानव तस्करीची घटना उघडकीस आली आहे. तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी केलेल्या तापसाअंती तीन महिलांसह एका दलालाला अटक करण्यात आली आहे, धक्कादायक म्हणजे या प्रकरणात अटक झालेल्या दोन महिला एका रुग्णालययातील परिचारिका आहेत. या प्रकरणात सहभागी असलेल्या महिलेच्या घरी दोन मुलं आणि पती असे चार सदस्य होते. या पैकी मोठा मुलगा आणि पती दारुडा आहे तर दुसऱ्या मुलाचा मृत्यू झाल्याने ती महिला ऐकटी पडली होती. त्यामुळे इतरांच्या सल्ल्यानं तिने हा धक्कादायक प्रकार केल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. त्यामुळे नागपुरात सध्या खळबळ माजली आहे.
कसं विकलं मुलाला?
दारुड्या मुलाकडे म्हातारपणी आपला निभाव लागणार नाही या चिंतेत असलेल्या महिलेने एक मूल दत्तक घेण्यासाठी प्रयत्न केले होते, मात्र त्यात यश न आलेल्याने त्यांनी (आयव्हीएफ) टेस्ट ट्यूब बेबीसाठी सुद्धा प्रयत्न केले मात्र त्यातही यश मिळाले नाही. त्यादरम्यान रुग्णालयातील दोन परिचारिका त्यांच्या संपर्कात आल्या होत्या. त्यांनी बाळ हवं असेल तर सलामुल्ला खान या एजंट सोबत संपर्क साधण्याचा सल्ला दिला. महिलेने एजंट सलामुल्ला खान सोबत संपर्क केला असता त्याने तीन लाख रुपयांमध्ये बाळ उपलब्ध करून दिले. सुमारे तीन वर्षे ही बाब लपून राहिली. मात्र, ज्यावेळी त्या महिलेच्या मोठ्या मुलाला या प्रकरणाची कुणकुण लागली तेव्हा पोलिसांनी गुप्तपणे तपास सुरू केला, तेव्हा महिलेने बाळ तीन लाख रुपयांमध्ये विकत घेतल्याचं स्पष्ट होताच पोलिसांनी महिलेसह दोन परिचारिका आणि दलाला सलामुल्ला खान याला अटक केली आहे.
चुकीचा मार्ग अवलंबल्याने गोत्यात
बाळ असावं असं प्रत्येक महिलेला वाटत मात्र ते स्वतःच नसेल किंवा दत्तक घ्यायचं असेल तर एक प्रक्रिया असते आणि ते पूर्ण करावी लागते मात्र या महिलेने सगळे नियम बाजूला ठेवत चुकीचा मार्ग अवलंबला आणि आता पोलिसांच्या कारवाईला सामोरं जावं लागत आहे. आपल्याकडे मुलं म्हणजे देवाघरची फुलं म्हणतात, मात्र त्याच लहान मुलांच्या बाबतीत असे वारंवार समोर येणारे प्रकार विचार करायला भाग पाडणारे आहेत.