इंस्टाग्रामवर सुत जुळलं, प्रेमातून गर्भधारणा, नंतर जे काही उजेडात आलं त्यामुळे नागपूर हादरलं

यात बाळाचा मृत्यू झाला आहे, शवविच्छेदनाच्या अहवालानंतर पुढील कारवाई होईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच इन्स्ट्राग्राम आयडीवरून अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या तरुणाचा शोध घेतला जात आहे.

इंस्टाग्रामवर सुत जुळलं, प्रेमातून गर्भधारणा, नंतर जे काही उजेडात आलं त्यामुळे नागपूर हादरलं
इन्स्टावर लाईक्स आणि फॉलोअर्स मिळवण्यासाठी तरुणाचा नको तो प्रतापImage Credit source: tv9marathi
Follow us
| Updated on: Mar 05, 2023 | 1:09 PM

सुनील ढगे, नागपूर : अल्पवयीन मुलीची इंस्टाग्रामवर (instagram) झालेल्या प्रेमातून गर्भधारणा झाली. त्याची मुलीच्या घरात कुणालाच कल्पना नव्हती. मुलीने युट्यूबच्या (youtube) माध्यमातून घरात प्रसुती केली. ही धक्कादायक घटना उघडकीस आल्यानंतर मुलीच्या घरच्यांना मोठा धक्का बसला आहे. या सगळ्यामध्ये नवजात मुलाचा मृत्यू झाला आहे. मुलीच्या आईने पोलिस स्टेशनमध्ये आरोपी विरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी (nagpur police) या प्रकरणी त्या तरुणाचा सोशल मीडियाच्या अकाऊंटवरुन शोध घ्यायला सुरुवात केली आहे. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ माजली आहे.

पीडित मुलीने आईला संपूर्ण घटनाक्रम सांगितला

नवव्या वर्गात शिकणाऱ्या पंधरा वर्षीय मुलीची वर्षभरापूर्वी इंस्टाग्रामवरून एका तरुणाशी सुत जुडलं. त्यानंतर त्या तरुणाने त्याचा फायदा घेत तिच्यावर अतिप्रसंग केला. यातून तिला गर्भधारणा झाली, घरात कोणाला कळू नये म्हणून त्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलींन स्वतः च घरात प्रसूती करत बाळाला जन्म दिला. मात्र संध्याकाळी मुलीची आई घरी आल्यावर प्रकृती खराब असल्यानं तिला मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यानंतर पीडित मुलीने आईला संपूर्ण घटनाक्रम सांगितला. यावरून पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून इंन्स्टाग्राम आयडीवरून मिळलेल्या नावाच्या आयडीवरुन तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास अंबाझरी पोलीस करत आहे. मुलीने युट्यूब बघून प्रसूती केली असल्याची चर्चा होत आहे. मात्र पोलिसांनी या संदर्भात माहिती नसल्याचं सांगितलं आहे.

हे सुद्धा वाचा

शवविच्छेदनाच्या अहवालानंतर पुढील कारवाई होईल

यात बाळाचा मृत्यू झाला आहे, शवविच्छेदनाच्या अहवालानंतर पुढील कारवाई होईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच इन्स्ट्राग्राम आयडीवरून अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या तरुणाचा शोध घेतला जात आहे. यात मुलीने युट्यूबवरून की अन्य कशावरून माहिती घेत प्रसूती केल्याबाबत अद्याप स्पष्ट झालेलं नसल्याचं पोलिसांनी सांगितले.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.