दोघा प्रवाशांना रिंग रोडला नेलं, संध्याकाळी रिक्षाचालकाचा मृतदेह आढळला, नागपुरात खळबळ

नागपूरच्या हुडकेश्वर परिसरातील आऊटर रिंग रोडवर दगडाने ठेचून एका रिक्षाचालकाची हत्या करण्यात आल्याचं समोर आलं आहे. (Nagpur Rickshaw Driver Murder)

दोघा प्रवाशांना रिंग रोडला नेलं, संध्याकाळी रिक्षाचालकाचा मृतदेह आढळला, नागपुरात खळबळ
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Mar 12, 2021 | 7:41 AM

नागपूर : नागपुरात रिक्षाचालकाच्या हत्येने एकच खळबळ उडाली आहे. हुडकेश्वर परिसरात रिक्षाचालकाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. रिक्षाचालक दोघा प्रवाशांना घेऊन रिंग रोडला गेला होता, परंतु संध्याकाळी त्याचा मृतदेह आढळला. गेल्या चार दिवसातील हत्येची ही तिसरी घटना आहे. (Nagpur Crime Rickshaw Driver Murder Dead body found at outer ring road)

दगडाने ठेचून एका रिक्षाचालकाची हत्या

गेल्या काही वर्षांत नागपुरात गुन्हेगारी फोफावत चालल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी राज्याच्या उपराजधानीत सुरु झालेलं हत्यांचं सत्र अद्यापही सुरुच आहे. नागपूरच्या हुडकेश्वर परिसरातील आऊटर रिंग रोडवर दगडाने ठेचून एका रिक्षाचालकाची हत्या करण्यात आल्याचं समोर आलं आहे.

महिला-पुरुष प्रवाशांसह रिंगरोडला

अनिल हंसराज बर्वे असं मयत ऑटो चालकाचं नाव आहे. गुरुवारी दुपारच्या वेळी अनिल एक महिला आणि एका पुरुष प्रवाशाला घेऊन रिंग रोडकडे गेला होता. मात्र नंतर त्याचा मृतदेह आढळून आल्याने अनेक शंका उपस्थित होत आहेत. गेल्या चार दिवसातील हत्येची ही तिसरी घटना असल्यामुळे नागपुरात भीतीचं वातावरण पसरल्याचं बोललं जात आहे. नागपुरात नेमकं काय सुरु आहे, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

पॉर्न दाखवून पतीची हत्या

दोन दिवसांपूर्वी नागपुरातील गणेशपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या रजत संकुलमध्ये एका वृद्ध इसमाचे हात-पाय खुर्चीला बांधल्यानंतर गळा चिरून खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली होती. या घटनेचा तपास करताना पोलिसांनी धक्कादायक खुलासे केले आहेत. मृतक लक्ष्मण मलिक यांचा खून त्यांच्या पाचव्या क्रमांकाच्या पत्नी स्वातीने केल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली आहे. या प्रकरणी पत्नीला अटक करण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून मृतक लक्ष्मण मलिक हे एकटेच रजत संकुल येथील फ्लॅट मध्ये राहत होते. दरम्यान, 8 मार्चला संध्याकाळी त्यांची पाचव्या क्रमांकाची पत्नी स्वाती त्यांना भेटण्यासाठी त्या फ्लॅटवर गेली. यावेळी स्वातीने सोशल मीडियावर उपलब्ध असलेले पॉर्न व्हिडीओ दाखवून त्यांचे हात आणि पाय खुर्चीला बांधले. त्यानंतर तिने सोबत आणलेल्या धारधार चाकूने लक्ष्मण मलिक यांचा गळा चिरून खून केला.

संबंधित बातम्या :

आधी तिनं नवऱ्याला पॉर्न व्हिडीओ दाखवले, नंतर खुर्चीला बांधलं आणि…

सासूच्या हत्येची फिर्याद देणारी सूनच निघाली खूनी, जमिनीसाठी दोरीने गळा आवळून हत्या

(Nagpur Crime Rickshaw Driver Murder Dead body found at outer ring road)

‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?.
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?.
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.