Nagpur : आईचं लक्ष चुकवून 14 महिन्यांच्या मुलीला बापाने भलत्याच रेल्वेत बसवलं आणि…

14 महिन्यांचा पोटच्या पोरीसोबत बाप असं करेल, याची तिच्या आईला कल्पनाही नव्हती!

Nagpur : आईचं लक्ष चुकवून 14 महिन्यांच्या मुलीला बापाने भलत्याच रेल्वेत बसवलं आणि...
14 महिन्यांची चिमुरडी बेपत्ता...Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Nov 11, 2022 | 9:41 AM

नागपूर : नागपूर रेल्वे स्थानकातील (Nagpur Railway Station) एक अजब प्रकार उघडकीस आलाय. एका 14 वर्षांच्या चिमुरडीच्या पित्याने तिला भलत्याच ट्रेनमध्ये बसवलं. त्यानंतर तिचं अपहरण (Nagpur Kidnapping) झालं असल्याचा बनाव रचला. महत्त्वाचं म्हणजे आईचं लक्ष चुकवून पित्यानं हे कृत्य केलं. पण अखेर आरोपी पित्याचा कट उघडकीस आलाच! मात्र 14 महिन्याच्या मुलीचा अजूनही शोध लागू शकलेला नाही. सध्या या मुलीचा शोध घण्याचं आव्हानं पोलिसांसमोर उभं ठाकलंय. पोलिसांनी (Nagpur Crime News) केलेल्या चौकशीतून बापानेच हे धक्कादायक कृत्य केल्याचं समोर आलंय.

आरोपी पित्याचं नाव कृष्णकुमार राजकुमार कोसले असं आहे. तो मूळचा रायपूर, छत्तीसगड येथील रहिवासी आहे. त्याला एक मुलगा आणि मुलगी आहे. पत्नीसह तो प्रवास करत होता. त्याची पत्नीही गर्भवती असल्याची माहिती समोर आलीय.

7 नोव्हेंबर रोजी ही घटना घडली. कृष्णकुमार हा चेन्नईला कामाच्या शोधात गेला होता. पण पत्नीच्या प्रसुतीची वेळ जवळ येऊ लागल्याने तो पुन्हा गावी परतत होता. वाटेत तो रात्री नागपूर स्थानकात उतरला. ती रात्र त्याने नागपूर रेल्वे स्थानकात काढली.

सकाळ सहा साडे सहा वाजण्याच्या सुमारास पत्नीचं लक्ष नाही हे पाहून कृष्णकुमार कोसले याने डाव साधला. त्याने आपल्या अवघ्या 14 महिन्यांच्या जिज्ञासा या मुलीला उचललं आणि जबलपूर अमरावती एक्स्प्रेसच्या जनरल कोसमध्ये जाऊन बसला. पण जशी गाडी रेल्वे स्थानकातून सुटली, तसा कुष्णकुमार मुलीला एकटीला तिथंच ठेवून गाडीतून खाली उतरला.

जेव्हा पत्नीने कृष्णकुमारकडे विचारणा केली तेव्हा एकाने आपल्याला मारहाण करुन जिज्ञासाला पळवून नेल्याचं त्यानं सांगितलं. यानंतर दाम्पत्य गावी गेलं. तिथे कुटुंबीयांचा संशय बळावला. अखेर पोलीस तक्रार करण्यासाठी दाम्पत्याने नागपूरचं शांतीनगर पोलीस ठाणं गाठलं.

पोलिसांनी कृष्णकुमारची चौकशी केली. या चौकशीदरम्यान कृष्णकुमार हडबडला. अखेर पोलिसांचा संशय अधिक बळावला आणि त्यांनी पोलिसी खाक्या दाखवताच कृष्णकुमार याने आपल्या कृत्याची कबुली दिली. आता हा कट उघड झाला असला तरी मुलीचा शोध घेण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे. पोलिसांनी या मुलीचं छायाचित्र प्रसिद्ध केलं असून ही चिमुकली कुठे दिसली तर नागपूर पोलिसांना कळवावं, असं आवाहन करण्यात आलंय.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.