Nagpur Crime : नागपूरमध्ये गोंडवाना एक्स्प्रेसमधून 42 किलो गांजा जप्त

गाडी क्रमांक 12409 गोंडवाना एक्सप्रेसच्या एसी कोचमधून अंमली पदार्थाची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती आरपीएफच्या पथकाला मिळाली होती. माहितीच्या आधारे आरपीएफच्या पथकाने गोंडवाना एक्सप्रेसची तपासणी सुरू केली तेव्हा एसी कोचच्या B-3 मध्ये 2 निळ्या रंगाच्या ट्रॉली आणि 1 सॅग, एका छोट्या बॅगमध्ये गांजाचा वास येत होता.

Nagpur Crime : नागपूरमध्ये गोंडवाना एक्स्प्रेसमधून 42 किलो गांजा जप्त
डोंबिवलीमध्ये एटीएम फोडणारा उच्चशिक्षित चोरटा गजाआडImage Credit source: TV 9
Follow us
| Updated on: Mar 07, 2022 | 3:26 PM

नागपूर : नागपूर रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या गोंडवाना एक्सप्रेस (Gondwana Express)च्या एसी कोचमधून 42 किलो 130 ग्रॅम गांजा (Ganja) जप्त करण्यात आला आहे. आरपीएफकडून एसी कोचची नियमित तपासणी सुरू असताना दोन ट्रॉली बॅग आणि दोन छोट्या बॅग बेवारस स्थितीत आढळून आल्या होत्या. संबंधित बॅगच्या संदर्भात विचारपूस केली असता कुणीही बॅगवर हक्क सांगत नसल्याने आरपीएफच्या पथकाने कसून चौकशी सुरू केली. यावेळी एका व्यक्तीची संशयाच्या आधारे विचारपूस केली असता त्याने बॅग त्याचीच असल्याचं कबुल केलं आणि त्यात गांजा असल्याची माहिती दिली. आरपीएफने आरोपीला ताब्यात घेऊन गांजा जप्त करण्यात आला आहे. (42 kg cannabis seized from Gondwana Express in Nagpur)

एक्स्प्रेसमधून 4 लाख 25 हजार रुपयाचा गांजा जप्त

गाडी क्रमांक 12409 गोंडवाना एक्सप्रेसच्या एसी कोचमधून अंमली पदार्थाची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती आरपीएफच्या पथकाला मिळाली होती. माहितीच्या आधारे आरपीएफच्या पथकाने गोंडवाना एक्सप्रेसची तपासणी सुरू केली तेव्हा एसी कोचच्या B-3 मध्ये 2 निळ्या रंगाच्या ट्रॉली आणि 1 सॅग, एका छोट्या बॅगमध्ये गांजाचा वास येत होता. प्रावस करणाऱ्यांची विचारपूस केली तेव्हा त्याने उडवाउडवीची उत्तर देऊन आरपीएफ पथकाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र जेव्हा त्याची कसून चौकशी केली तेव्हा आरोपीने आपला गुन्हा मान्य केला. जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत 4 लाख 25 हजार रुपये इतकी आहे. आरोपीने हा गांजा विशाखापट्टनम येथून खरेदी केला असून मध्यप्रदेशच्या भपोळ येथे विक्रीसाठी घेऊन जातं असल्याची माहिती आरपीएफला दिली आहे.

बागमती एक्स्प्रेसमधून 3 किलो सोने, 30 किलो चांदी जप्त

चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर रेल्वे पोलिसांनी रविवारी एक धडाकेबाज कारवाई केली. तामिळनाडूच्या त्रिपुर येथील सराफाकडून लुटलेले 3 किलो सोने व 30 किलो चांदीसह साडे14 लाखांची रक्कम रेल्वेगाडीतून जप्त केली. चेन्नई येथून बागमती एक्सप्रेसने हे 4 चोरटे निघाले होते. रेल्वे सुरक्षा दलाच्या अंतर्गत गोपनीय माहितीनुसार बल्लारपूर रेल्वे स्थानकावर यासाठी मोठी शोध मोहीम राबवण्यात आली. चेन्नई येथून मिळालेल्या सीसीटीव्ही रेकॉर्डिंग व फोटोच्या आधारे बिहार राज्यातील रहिवासी असलेल्या चार चोरट्यांना पोलिसांनी अटक केली. स्वतःची ओळख लपवून, वेष बदलून हे आरोपी वेगवेगळ्या बर्थवर बसले होते. त्यांच्याकडे वेगवेगळ्या 7 गाठोड्यांमध्ये चोरीचे साहित्य लपवून ठेवले होते. घटनेत जप्त साहित्य व आरोपींना तामिळनाडू पोलिसांच्या स्वाधीन केले जाणार आहे. (42 kg cannabis seized from Gondwana Express in Nagpur)

इतर बातम्या

चोरी करायला आलेल्या तरुणाचा मृत्यू, साथीदारही बघत राहिले, अहमदनगरमध्ये धक्कादायक प्रकार

होम स्टे मालकाकडे 2000 हून अधिक जोडप्यांचे अश्लील व्हिडीओ, सिक्रेट कॅमेराने खासगी क्षणांचं शूटिंग

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.