60 वर्षीय वृद्धाकडून आधी लिफ्ट, मग 400 रुपयेही घेतले! अखेर त्यालाच बाथरुममध्ये डांबलं, त्याच्या बायकोलाही मारलं
Amravati Crime News : भडांगे घरता येताच महिलेने घराचं दार बंद केलं. त्यानंतर दोन अन्य महिला फ्लॅटमध्ये आल्या. तिघा महिलांनी मिळून भडांगे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करत धमकावलं. 60 रुपये द्या, नाहीतर तुमच्याविरोधात बलात्काराची आणि विनयभंगाची पोलिसात तक्रार देऊ, अस म्हणत घाबरवलं.
अमरावती : माणुसकीखातर जर तुम्ही कुणालाही लिफ्ट देत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी. एका वृद्ध इसमाला महिलेला लिफ्ट (Amravati crime news) देणं चांगलंच महागात पडलंय. लिफ्ट देण्याच्या बहाण्याने संपर्कात आलेल्या महिलेनं या वृद्धा ब्लॅकमेल (Amravati lift Blackmailing) केल्यानं अमरावतीत (Amravati) खळबळ माजलीय. ‘अहो ऐका ना, माझ्या गाडीतलं पेट्रोल संपलंय, लिफ्ट द्याल का’, असं म्हणत एका 60 वर्षीय वृद्धाकडे मदत मागितली होती. पण पुढे जाऊन हीच महिला आपल्याला ब्लॅकमेल करेल, याची पुसटशीही कल्पना या वृद्ध व्यक्तीला नव्हती. ही घटना घडली. अमरावतीच्या गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये. एका महिलेने वृद्ध व्यक्तीकडून लिफ्ट मागितली. त्याच वेळी मदतीसाठी 400 रुपयेही उसणे घेतले. हे पैसे परत करण्यासाठी वृद्ध व्यक्तीला महिलेनं घरी बोलावलं. आपल्या फ्लॅटमधील एका खोलीत महिलेनं आपल्या अन्य दोन मैत्रिणींच्या मदतीने डांबून ठेवलं आणि वृद्धाला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. तुझ्याविरुद्ध बलात्कार आणि विनयभंगाची खोटी तक्रार करु, अशी धमकी या वृद्धाला देण्यात आली. त्या बदल्यात 60 हजार रुपयांची मागणी या वृद्धाकडून करण्यात आली होती.
नेमकी कुठे घडली घटना?
ही घटना ज्या वृद्ध व्यक्तीसोबत घडली, त्याचं नाव नंदकिशोर भडांगे असं आहे. नवसारीतील नवोदय विद्यालयाजवळ ही 60 वर्षीय व्यक्ती राहायला आहे. भंडागे आपल्या दुचाकीवरुन जात होते. 17 ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास ते जात असताना त्यांना एक महिलेनं हात केली आणि मदत मागितली. लिफ्ट द्याल का, माझ्या गाडीतील पेट्रोल संपलंय, असं म्हणत महिलेनं विचारणा केली. माणुसकीखातर वृद्ध इसमानेही या महिलेला मदत केली. पेट्रोल पंपापर्यंत या महिलेला वृद्धाने सोडलं आणि वरुन पेट्रोल खरेदी करण्यासाठी 400 रुपयेही दिले.
यावेळी महिलेनं पैसे परत करण्यासाठी वृद्धाचा मोबाईल नंबर घेतला. यानंतर महिलेनं या वृद्धाचा अक्षरशः पिच्छाच पुरवला. 21 ऑगस्ट रोजी महिलेनं या वृद्धाला आपल्या फ्लॅटवर पैसे घेण्यासाठी बोलावलं. फ्लॅटच्या आत येताच महिलेनं दरवाजा बंद केला. भडांगे यांनी घराच्या बाहेर थांबतो, असं म्हटलं. पण बहीण पैसे घेऊन येतेय, असं म्हणत त्यांना आत बोलावलं.
बांथरुमध्ये डांबलं, बायकोलाही मारलं
भडांगे घरता येताच महिलेने घराचं दार बंद केलं. त्यानंतर दोन अन्य महिला फ्लॅटमध्ये आल्या. तिघा महिलांनी मिळून भडांगे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करत धमकावलं. 60 रुपये द्या, नाहीतर तुमच्याविरोधात बलात्काराची आणि विनयभंगाची पोलिसात तक्रार देऊ, अस म्हणत घाबरवलं. अखेरीस भडांगे यांना बाथरुममध्ये बंद केलं.
अखेर गुन्हा
प्रचंड घाबरलेल्या भडांगे यांनी अखेर 60 हजार रुपये देणं मान्य केल्यानंतर त्यांना खोलीतून बाहेर काढण्यात आलं. तीन दिवसात पैसे देतो, असं त्यांनी सांगितलं. 25 ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास पैसे घेण्यासाठी दोन महिला आल्या. भडांगे यांच्या घरात शिरुन त्यांनी त्यांच्या पत्नीला मारहाण केली. पण तिथे आरडाओरडा झाल्याने दोघीजणी पळून गेल्या. अखेर भडांगे यांनी पोलीस स्थानक गाठलं आणि हिंमत करुन याप्रकरणी तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनीही तिघाजणींविरुद्ध गुन्हा दाखल केला. नोटीस देऊन तिघाही महिलांना सोडून देण्यात आल्याची माहिती गाडगेनगर पोलीस ठाण्याचे ठाणेदार आसाराम चोरमले यांनी दिली.