मौजमस्तीसाठी बाईक चोरायचा, पेट्रोल संपले की त्याच ठिकाणी सोडून द्यायचा; अखेर पोलिसांच्या हाती लागलाच
एका बाईक चोरीच्या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांना हा चोर आढळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत उलट तपासणी केली असता त्याच्याकडे पाच बाईक आढळून आल्या.
नागपूर : मौज मस्ती (Enjoy) करण्यासाठी बाईक चोरून नेणाऱ्या विधी संघर्ष बालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपीकडून पाच बाईक (Bikes) पोलिसांनी हस्तगत करण्यात आल्या आहेत. हा अल्पवयीन चोर (Minor Thief) बाईक चोरायचा आणि पेट्रोल संपलं की काही त्याच ठिकाणी सोडून द्यायचा. अशा प्रकारचा उद्योग लहान वयातच हा करत होता. मात्र एका चोरीच्या प्रकरणाचा तपास करताना हा चोर पोलिसांच्या हाती लागला आहे.
मौजमस्ती करण्यासाठी बाईक चोरायचा
विधी संघर्ष म्हणजेच अल्पवयीन मुलाला आपल्या मौज मस्तीसाठी आणि शौक पूर्ण करण्यासाठी बाईक चोरायची सवय लागली. मौज मस्ती करण्यासाठी बाईक चोरायचा. काही बाईक चालवून पेट्रोल संपलं की त्याच ठिकाणी सोडून द्यायचा. तर काही मात्र त्याच्या ताब्यात होत्या.
एका गुन्ह्याचा तपास करताना पकडला
एका बाईक चोरीच्या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांना हा चोर आढळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत उलट तपासणी केली असता त्याच्याकडे पाच बाईक आढळून आल्या. त्यापैकी तीन बाईक चोरीचा गुन्हा सिद्ध झाला तर दोन गुन्ह्यांचा तपास सुरू आहे.
पोलिसांनी या पाचही बाईक हस्तगत करून विधी संघर्ष बालकाला ताब्यात घेतले आहे.
लहान वयात समज नसल्याने मुलं काय करतील आणि कोणत्या मार्गाला जाईल याचा भरोसा नसतो. मात्र हा तर असा निघाला की, याने चक्क आपली मौज मस्ती करण्यासाठी जणू बाईक चोरीचा व्यवसायच सुरू केला होता.
मात्र आता पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. पण आपला मुलगा काय करतो याकडे पालकांनी सुद्धा लक्ष ठेवण्याची गरज आहे.