दोन वर्षांचा चिमुकला खेळत होता; तोल जाऊन थेट पाचव्या माळ्यावरून कोसळला
अहफाज गेला. तो परत येणार नाही. पण, त्याच्या दोन वर्षांच्या आठवणी आई-वडील आणि नातेवाईकांच्या डोळ्यापुढं तरळत राहतील.
नागपूर : ही घटना आहे नागपुरातली उप्पलवाडी परिसरातील. दोन वर्षांचा चिमुकला नेहमीप्रमाणे घरी खेळत होता. त्याला सुरक्षित ठिकाणी खेळताना बघून पालकही बिनधास्त होते. मात्र त्याच्याकडे त्यांचे लक्ष होते. परंतु काही क्षणात तो घराच्या गॅलरीत गेला आणि येथे खेळता-खेळता त्याचा तोल सुटला. तो थेट पाचव्या माळ्यावरून खाली कोसळला. या दुर्घटनेत या चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. शेख मोहरस शेख ख्वाजा यांना शेख अहफाज हा दोन वर्षांचा मुलगा होता. ख्याजा कुटुंबीय हे कामठी रोडवरील उप्पलवाडी येथे राहत होते. त्यांचे घर येथे पाचव्या माळ्यावर आहे. सर्वकाही सुरळीत सुरू होते. पण, त्यांच्या कुटुंबावर अचानक मोठा आघात झाला. ते त्यांच्या बाळाचे व्यवस्थित संगोपन करीत होते. अहफाज हा छोटा असल्यामुळे घरात सर्वत्र धावत-फिरत होता.
खेळता-खेळता तोल गेला
अहफाज हा लहान असल्याने घरच्यांचे त्याच्याकडे लक्ष असायचे. तो खेळता-खेळता घराच्या बालकनीत पोहोचला. या ठिकाणी तो यापूर्वीही खेळत होता. तो खेळत असताना बालकनीच्या रॉडवर पोहोचला. येथे खेळता-खेळता त्याचा अचानक तोल सुटला. तो सरळ पाचव्या माळ्यावरून खाली पडला. यावेळी बालकनीत कुणीही नव्हते. तो खाली पडल्यानंतर त्यांच्या डोक्याला आणि शरीराच्या अन्य भागाला गंभीर जखमा झाल्या. मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. तोपर्यंत त्याचा श्वास राहिला नव्हता.
अहफाजचे ते बोबडे बोल आठवतात
तोल गेल्याने अहफाज पडला. लहान मुलं असली की, ते बिनधास्त खेळतात. खेळण्याच्या भरात कधीकधी त्यांचे लक्ष नसते. अशावेळी त्यांच्यावर नजर ठेवणे आवश्यक असते. अहफाज गेला. तो परत येणार नाही. पण, त्याच्या दोन वर्षांच्या आठवणी आई-वडील आणि नातेवाईकांच्या डोळ्यापुढं तरळत राहतील. त्याचे ते बोबडे बोल घरच्यांच्या कानात घुमतील. आई तर कित्तेक दिवस माझा अहफाज कुठं गेला, या चिंतेत राहील.