Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nagpur Missing Boy : बिहारमधून हरवला होता मुलगा, आधार कार्डमुळे सहा वर्षानंतर झाली कुटुंबीयांशी भेट

बिहारच्या खागोरिया जिल्ह्यातील मछरा गावातील सोचन कुमार यादव हा 2016 साली बेपत्ता झाला होता. मूकबधिर असलेला सोचन हा नागपूर मध्यवर्ती रेल्वे स्थानकावर चाईल्ड लाईनला आढळून आला. त्यावेळी तो 15 वर्षाचा होता.

Nagpur Missing Boy : बिहारमधून हरवला होता मुलगा, आधार कार्डमुळे सहा वर्षानंतर झाली कुटुंबीयांशी भेट
आधार कार्डमुळे सहा वर्षानंतर झाली मुलाची कुटुंबीयांशी भेटImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Aug 21, 2022 | 9:01 PM

नागपूर : आयुष्य कधी कसं कलाटणी येईल हे सांगता येत नाही. असाच एक चमत्कार नागपुरमध्ये घडला आहे. बिहारमधून हरवलेला (Missing) किशोरवयीन मूक बधिर मुलगा तब्बल 6 वर्षानंतर कुटुंबियांना नागपुरात सुखरूप सापडला आहे. आणि हे सगळं शक्य झालं ते केवळ एका आधार कार्डमुळे. सोचन कुमार यादव असं या मुलाचे नाव आहे. बिहारमधून नागपूरमध्ये पोहचलेल्या मुलाला चाईल्ड लाईन (Child Line)ने बालगृहात ठेवले होते. शैक्षणिक कामाकरीता त्याचे आधार कार्ड (Aadhar Card) बनवण्यासाठी गेल्यानंतर त्याची ओळख आणि पत्ता सामाजिक संस्थेला मिळाला. त्यानंतर त्याच्या कुटुंबीयांशी संपर्क साधत त्यांच्याकडे त्याला सुपूर्द करण्यात आले.

चाईल्ड लाईनने बालगृहामध्ये ठेवले

बिहारच्या खागोरिया जिल्ह्यातील मछरा गावातील सोचन कुमार यादव हा 2016 साली बेपत्ता झाला होता. मूकबधिर असलेला सोचन हा नागपूर मध्यवर्ती रेल्वे स्थानकावर चाईल्ड लाईनला आढळून आला. त्यावेळी तो 15 वर्षाचा होता. तो मूकबधिर असल्याने आणि लिहिताही येत नसल्याने त्याच्याकडून कोणतीच माहिती मिळू शकली नाही. चाईल्ड लाईनने त्याचे ‘प्रेम इंगळे’ असे नामकरण केले. पुनर्वसनाच्या दृष्टीने पाटणकर चौक येथील शासकीय बालगृह येथे त्याला दाखल करण्यात आले. प्रेमच्या शैक्षणिक कामाकरीता त्याचे आधार कार्ड काढणे आवश्यक असल्याने त्याचे आधार कार्ड काढण्यासाठी संस्थेकडून प्रयत्न सुरु होते. परंतु आधार कार्ड बायोमेट्रिक रिजेक्ट होत होते.

आधार कार्ड काढण्यासाठी गेले असता त्याची माहिती मिळाली

मानकापूर येथील आधार कार्ड सेवा केंद्राचे मॅनेजर कॅप्टन अनिल मराठे यांनी अधिक चौकशी केली असता प्रेमचे आधार कार्ड आधीच काढले असल्याचे लक्षात आले. मूळ आधार कार्ड तपासल्यावर त्याचे नाव व पत्ता याची माहिती मिळाली. त्यावरून त्याच्या पालकांचा शोध घेऊन त्यांना माहिती देण्यात आली. सहा वर्षांनंतर बेपत्ता मुलाला पाहून आई रंजूदेवी सह शासकीय मुलांचे बालगृहातील वातावरण गहिवरून आले होते. आधार कार्डवरून नागपूरच्या आधार सेवा केंद्रात आतापर्यंत 7 बेपत्ता मुलाचा शोध घेण्यात आला असून, त्यापैकी 5 मुलं ही दिव्यांग आहेत. (Aadhar card found the missing boy from Bihar six years ago)

हे सुद्धा वाचा

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.