ठाण्यातील भामटा नागपूरमध्ये जेरबंद, आरोपीचे कारनामे ऐकून पोलीसही चक्रावले !
आरोपीने नेमकी कुठे कुठे अशा प्रकारची फसवणूक केली, याचा शोध आता पोलीस घेत आहेत. तसेच याचा आणखी कुणी साथीदार आहे का याचाही पोलीस तपास करत आहेत.
सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर : सोन्याचा मुलामा लावलेली नकली ब्रेसलेट (Fake Gold Bracelet) सोनाराकडे गहाण ठेवून त्या बदल्यात पैसे घेणाऱ्या ठाण्यातील एक ठगाला नागपूरमध्ये बेड्या ठोकण्यात (Accused Arrested) आल्या आहेत. नागपुरमधील पाचपावली पोलिसांनी (Nagpur Pachpavali Police) ही कारवाई केली आहे. हा भामटा केवळ नागपूरच नाही तर राज्यातील विविध शहरात मुलामा लावलेले नकली ब्रेसलेट गहाण ठेवून पैसे घेऊन परागंदा व्हायचा.
पैशांची गरज आहे सांगून ब्रेसलेट गहाण ठेवायचा
आरोपी विविध सोनारांकडे जायचा आणि पैशांची गरज आहे असे सांगून ब्रेसलेट गहाण ठेवायचं किंवा विकायचंय असा सांगायचा. एक महिन्यात गहाण ठेवलेले ब्रेसलेट सोडवून नेईन असं सांगायचा. गहाण ठेवलेल्या ब्रेसलेटवर एक ते दीट लाख रुपये सोनाराकडून घ्यायचा.
ब्रेसलेट सोन्याचे वाटावे म्हणून त्याची कडी सोन्याची बनवून बाकी मुलामा लावायचा. इतकेच नाही नकली ब्रेसलेटचे बिलही सोनाराला दाखवायचा. नागपूर शहरात अशा प्रकारे वेगवेगळे ब्रेसलेट गहाण ठेवून आरोपीने पैसा गोळा केला.
एका सोनाराला काहीतरी गडबड असल्याचे जाणवले
मात्र एका सोनाराला काहीतरी गडबड असल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्याने ब्रेलसेटची पुन्हा तपासणी केली असता ब्रेसलेटच्या वरच्या भागावर सोन्याचा मुलामा, कडी सोन्याची, मात्र त्याच्या आतमध्ये वेगळ्या धातूचा पदार्थ निघाला.
आरोपीने अन्य शहरातही अशी फसवणूक केल्याचे उघड
या धातूमुळे ब्रेसलेटचं वजन वाढत होतं. त्याद्वारे तो पैसा वसुल करत होता. पोलिसांनी आता त्याला अटक केली आहे. त्याने यापूर्वी वेगवेगळ्या राज्यातील अनेक शहरात अशाच प्रकारे फसवणूक केल्याची कबुली दिली.
आरोपीने नेमकी कुठे कुठे अशा प्रकारची फसवणूक केली, याचा शोध आता पोलीस घेत आहेत. तसेच याचा आणखी कुणी साथीदार आहे का याचाही पोलीस तपास करत आहेत.