ठाकरे गटाच्या उपशहर प्रमुखाच्या हत्येनं खळबळ! कुठे घडला हत्येचा थरार?

ठाकरे गटाच्या उपशहर प्रमुखाची मृत्यूशी सुरु असलेली झुंज अखेर अपयशी! का करण्यात आली हत्या?

ठाकरे गटाच्या उपशहर प्रमुखाच्या हत्येनं खळबळ! कुठे घडला हत्येचा थरार?
ठाकरे गटाच्या उपशहर प्रमुखाच्या हत्येचं कारण काय?Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Oct 31, 2022 | 10:28 AM

अकोला : अकोल्यात ठाकरे गटाचे उपशहर प्रमुख विशाल कपले (Vishal Kapale Murder) यांचा चाकूने भोसकून खून करण्यात आला. अकोला (Akola Crime News) शहरातल्या जठारपेठ चौकात त्यांच्यावर रविवारी संध्याकाळी प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात ते गंभीररीत्या जखमी झाले. त्यांना लगेचच स्थानिकांनी रुग्णालयात दाखल केलं. पण मृत्यूशी सुरु असलेली त्यांची झुंज अपयशी ठरली. त्यांचा रुग्णालयात मृत्यू झाला. यानंतर एकच खळबळ उडाली. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (Akola Police) तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.

अकोल्यातील ठाकरे गटाचे शिवसेनेचे अकोला उपशहर प्रमुख विशाल कपले हे त्यांच्या स्कूटीवरुन जात होते. मात्र काही हल्लेखोरांनी त्यांचा पाठलाग केला. त्यानंतर वाटेतच एके ठिकाणी त्यांना गाठलं आणि चाकूने सपासप वार केले. या हल्ल्यामध्ये 33 वर्षीय विशास कपले हे गंभीररीत्या जखमी झाले होते.

पाहा व्हिडीओ :

हे सुद्धा वाचा

रविवारी संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. मूळचे मोठी उमरी येथील रहिवासी असलेल्या विशाल कपले यांच्या मृत्यूने अकोल्यात खळबळ माजलीय. सध्या पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. मात्र अद्याप कुणाला अटक करण्यात आल्याची माहिती समोर आलेली नाही.

तीन ते चार युवकांनी विशाल कपले यांचा पाठलाग केल्याचं बोललं जातंय. महाकाली माता मंदिरापासून कपले यांचा पाठलाग करण्यात आला. त्यानंतर जठारपेठ येथील कोरडे हॉस्पिटल येथील गल्लीत वळताच त्यांच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला चढवण्यात आल्याचं सांगितलं जातंय.

जखमी विशाल यांच्यावर अकोल्यातल्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. अकोला शहरातल्या आयकॉन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.

आता याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करुन पुढील तपास करण्यात येणार आहे. विशाल यांच्यावर हल्ला करणारे कोण होते, याचा छडा लावण्याचं आव्हान सध्या पोलिसांसमोर उभं ठाकलंय. ठाकरे गटाच्या उपशहर प्रमुखाची हत्या नेमकी कोणत्या कारणामुळे करण्यात आली, असा प्रश्न आता उपस्थित केला जातो आहे.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.