Akola Suicide : ‘मुख्यमंत्री शिंदेनी मला न्याय द्यावा’ अकोल्यात प्रिंटींग प्रेस चालवणाऱ्या पत्रकाराची गळफास घेत आत्महत्या

Akola Crime News : 10 ऑगस्टला मुलगा प्रतुल काकाकडे रात्री झोपण्यासाठी गेला असता त्याच रात्री प्रभाकर विरघट यांनी त्यांच्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. तर दुसऱ्या दिवशी 11 ऑगस्टला शेजारीच राहणारा दुसरा मुलगा अखिल याने वडिलांना चहा नाश्तासाठी फोन केला असता वडिलांन कडून काहीही प्रतिसाद न मिळाल्याने त्याने घरी येऊन पाहिले. त्यावेळी वडिलांनी गळफास घेतल्याचे निदर्शनात आले.

Akola Suicide : 'मुख्यमंत्री शिंदेनी मला न्याय द्यावा' अकोल्यात प्रिंटींग प्रेस चालवणाऱ्या पत्रकाराची गळफास घेत आत्महत्या
पत्रकाराची आत्महत्याImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Aug 17, 2022 | 10:05 AM

अकोला : अकोल्यात (Akola Crime News) प्रिंटींग प्रेस चालवणाऱ्या ज्येष्ठ पत्रकाराने आत्महत्या (Akola Journalist Suicide) केली. विशेष म्हणजे सुसाईड नोटमध्ये, मुख्यमंत्री शिंदेंनी मला मृत्यूनंतर न्याय द्यावा अशी मागणीही आत्महत्या करणाऱ्या पत्रकाराने केली आहे. तसंच आठ लोकांमुळे आत्महत्या करत असल्याचा सुसाईड नोटमध्ये उल्लेख केलाय. अकोला शहरातल्या अकोट फाईल परिसरात राहणारे प्रभाकर गंगाराव विरघट (Prabhakar Virghat) हे पत्रकार असून प्रिंटींग प्रेस चालवायचे. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी असून आपल्या दोन मुलांन सोबत राहत होते. पण 10 ऑगस्टला मुलगा प्रतुल काकाकडे रात्री झोपण्यासाठी गेला असता त्याच रात्री प्रभाकर विरघट यांनी त्यांच्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. तर दुसऱ्या दिवशी 11 ऑगस्टला शेजारीच राहणारा दुसरा मुलगा अखिल याने वडिलांना चहा नाश्तासाठी फोन केला असता वडिलांन कडून काहीही प्रतिसाद न मिळाल्याने त्याने घरी येऊन पाहिले. त्यावेळी वडिलांनी गळफास घेतल्याचे निदर्शनात आले. वडिलांनी आत्महत्या केल्याचं पाहून मुलाला मोठा धक्काच बसला.

3 सुसाईड नोट

यानंतर अकोट फाईल पोलिसांना विरघट यांच्या मुलाने याबाबतची माहिती दिली. अकोट पोलिसांनी पंचनामा केला असता पत्रकार प्रभाकर विरघट यांच्या खिशात तीन चिठ्या सापडल्या. एका चिठ्ठीत प्रिंटींग प्रेसमध्ये फसगत केली आणि विश्वासघाताने आर्थिक अडचणीत आणले, त्यांना शिक्षा व्हावी, असा उल्लेख आहे.

दुसऱ्या चिठ्ठीत शहरातल्या कौलखेड येथील शिवशक्ती प्रिंटींग प्रेस मधील व्यवहारात 1988 मध्ये रमेश सरने, मोहन काजळे, मदन जोशी, प्रभाकर जोशी, रमेश गायकवाड, रमेश जैन, प्रेम कनोजीया, मोतीलालजी कनोजीया यांनी फसगत केली, विश्वासघात केला आर्थिक अडचणीत ठेवले, असा आरोप कऱण्यात आला आहे. आपल्याला गुन्हेगार केले म्हणून आत्महत्या करीत आहे, असंही त्यांनी नमूद केलंय.

हे सुद्धा वाचा

8 जणांवर आरोपी, थेट मुख्यमंत्र्यांकडे कारवाईची मागणी

तर तिसऱ्या चिठ्ठीत मुख्यमंत्री शिंदे सरकारने मला मृत्यूनंतर न्याय द्यावा. आठ जणांनी आपला विश्वासघात केला म्हणून आत्महत्या करीत आहे. या सर्वांवर कारवाई व्हावी, अशी मागणी करत आयुष्य संपवलंय. तसंच ख्रिश्चन कॉलनी येथे राहणारे प्रेस कामगार सुशीर वरघट याच्याकडून माहिती घ्यावी की, प्रेसमध्ये बसणारे आंबेडकरी चळवळीतील कोण कोण होते? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यापक चौकशीसाठी विशेष चौकशी अधिकारी नियुक्त करावा, असंही म्हटलंय. तर जेष्ठ पत्रकार प्रभाकर विरघट यांनी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीनुसार अकोट फैल पोलिसांनी आठ जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केलाय. सध्या पुढील तपास अकोट फाईल पोलीस करत आहेत.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.