VIDEO | गणवेशासह पिस्तुल घेऊन व्हिडीओ, अमरावतीतील पोलिसावर निलंबनाची कारवाई
अमरावती जिल्ह्याच्या चांदूरबाजार येथील पोलिस महेश मुरलीधर काळे यांनी हा व्हिडीओ केला होता. शासकीय गणवेशामध्ये हातात पिस्तुलासारख्या शस्त्राचा वापर करुन व्हिडीओ तयार केला.
अमरावती : हातात पिस्तुल घेऊन व्हिडीओ करणं अमरावतीतील पोलिसाला चांगलंच महागात पडलं आहे. पोलिस अंमलदार महेश मुरलीधर काळे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिस अधीक्षकांनी कारवाई केली.
काय आहे प्रकरण?
अमरावती जिल्ह्याच्या चांदूरबाजार येथील पोलिस महेश मुरलीधर काळे यांनी हा व्हिडीओ केला होता. शासकीय गणवेशामध्ये हातात पिस्तुलासारख्या शस्त्राचा वापर करुन व्हिडीओ तयार केला. हा व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर करताच काही काळातच व्हायरल झाला.
व्हिडीओ व्हायरल होताच कारवाई
शासकीय गणवेश आणि शस्त्राचा चुकीचा उपयोग केल्याने बेशिस्त आणि बेजबाबदार वर्तनाबद्दल पोलिस अंमलदार महेश मुरलीधर काळे याला अमरावती ग्रामीण पोलिस अधीक्षक डॉ. हरी बालाजी यांनी निलंबित केले आहे. दोन दिवसांपूर्वी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मंगळवारी सायंकाळी पोलीस अधीक्षकांनी कारवाई केली.
पाहा व्हिडीओ :
संबंधित बातम्या :
विनामास्क बेशिस्त वर्तन करणाऱ्या चार पोलिसांचं निलंबन, लातूर पोलीस अधीक्षकांची कारवाई
नागपुरात 35 वर्षीय तरुणाची आत्महत्या, पोलिसांच्या मारहाणीमुळे जीव दिल्याचा आरोप
काळी-पिवळी चालकांकडून पैसे घेणारा वाहतूक पोलीस कर्मचारी अखेर निलंबित, वाचा संपूर्ण प्रकरण