Video : दारु प्यायले, वर्गात आले, टेबलावर पाय ठेवून झोपले, अखेर चक्क जीन्समध्येच……..! मेळघाटातील तर्राट झेडपी शिक्षकाचा व्हिडीओ व्हायरल

Drunk teacher viral video : एक शिक्षक वर्गात झोपलेला आहे. त्याचे पाय टेबलावर आहे. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या या शिक्षिकाला कशाचच भान नाहीये. वर्गातील विद्यार्थीही वर्गाबाहेर गेलेत. वर्गातले सरच दारु पिऊन आल्यामुळे विद्यार्थीही गोंधळून गेलेत. अ

Video : दारु प्यायले, वर्गात आले, टेबलावर पाय ठेवून झोपले, अखेर चक्क जीन्समध्येच........! मेळघाटातील तर्राट झेडपी शिक्षकाचा व्हिडीओ व्हायरल
दारु प्यायलेले शिक्षक...Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Aug 20, 2022 | 11:33 AM

अमरावती : अमरावती (Amravati) जिल्ह्यातील मेळघाटमध्ये (Melghat) शिक्षण व्यवस्थेची किती दयनीय अवस्था आहे, हे अधोरेखित करणारी घटना समोर आली आहे. एका शाळेतील मद्यधुंद शिक्षकाचा व्हिडीओ सध्या व्हायरल झालाय. यात शाळेतील शिक्षक (Drunk ZP Teacher Viral Video) चक्क वर्गात दारु पिऊन झोपलाय. शाळेतील विद्यार्थी ऑफ पीरियर मिळला म्हणून मस्ती करत सुटलेत. हे सगळं एका व्यक्तीने आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केलं असून आता संपूर्ण अमरावती जिल्ह्यामध्ये या शिक्षिकाचा व्हिडीओ चर्चेत आलाय. अनेक व्हॉट्सअप ग्रूप आणि सोशल मीडियामध्ये या व्हिडीओमुळे सवाल उपस्थित केले जात आहेत. हा सगळा प्रकार आहे अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील धारणी तालुक्यातला. धारमी तालुक्यातील काकरमल येथील जिल्हा परिषद शाळेतील हा धक्कादायक प्रकाराचा व्हिडीओ झेडपी शाळेतील शिक्षकांवर कुणाचाच वचक नसल्याचं अधोरेखित करतोय. दारु पिऊन शाळेच्या वर्गात विद्यार्थ्यांसमोरच विचित्र अवस्थेत झोपी गेलेल्या या शिक्षकावर कारवाई करण्याचीही मागणी केली जातेय.

व्हिडीओमध्ये काय?

व्हायरल व्हिडीओमध्ये एक शिक्षक वर्गात झोपलेला आहे. त्याचे पाय टेबलावर आहे. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या या शिक्षिकाला कशाचच भान नाहीये. वर्गातील विद्यार्थीही वर्गाबाहेर गेलेत. वर्गातले सरच दारु पिऊन आल्यामुळे विद्यार्थीही गोंधळून गेलेत. अशातच एक इसम मोबाईलमध्ये व्हिडीओ काढत या शिक्षिकाला जागं करतो. त्याला प्रश्न विचारतो. त्यानंतर हा शिक्षक वर्गातील हलत-डुलतच बाहेर जातो. धक्कादायक बाब म्हणजे या शिक्षिकाने चक्क जीन्समध्येच लघुशंकाही केलेली असते.

हे सुद्धा वाचा

विद्यार्थ्यांनाही याबाबत विचारणा केली जाते. सकाळी सर दारु पिउनच आले होते, असा आरोप विद्यार्थ्यांनी केलाय. असं पहिल्यांच सरांनी केलं असल्याचंही विद्यार्थ्यी सांगतात. दरम्यान, व्हिडीओ काढणारा व्यक्ती या गुरुजींना फैलावर घेत त्यांना असं वागणं शोभतं का, असे सवाल करताना देखील दिसून आला आहे.

पाहा व्हिडीओ :

दारु पिऊन शाळेच्या वर्गात झोपी गेलेल्या या गुरुजींचं नाव पृथ्वीराज चव्हाण असं आहे. ते धारणी तालुक्यातील काकरमल येथील जिल्हा परिषद शाळेत सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत आहे. गावातील उपसरपंच आणि पालकांच्या निदर्शनास हे प्रकरण आल्यानंतर त्यांनी संबंधिक अधिकाऱ्यांकडे या मद्यधुंद शिक्षकाबाबत जाब विचारला आहे. आता चौकशीअंती या शिक्षकावर काय कारवाई होते, हे पाहणं महत्त्वाचंय. मात्र मद्यधुंद अवस्थेत शाळेत येण्याची हिंमत या शिक्षकाची कशी झाली, असाही प्रश्न उपस्थित होतो. ग्रामीण भागातील शाळांमधील शिक्षकांनाच आता शिस्त लावण्याची गरज असल्याची गरज या घटनेमुळे व्यक्त केली जातेय.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.