Amravati Suicide : जिलेटीनच्या कांड्याचा स्फोट करुन जीव दिला! मेळघाटातील आत्महत्येचा खळबळजनक प्रकार उघडकीस
रामू गायकवाड असं आत्महत्या करणाऱ्या इसमाचं नाव आहे. या व्यक्तीने राहत्या घरात आत्महत्या केली. मासेमारी करण्यासाठी या व्यक्तीने जिलेटीन आणलं होतं.
अमरावती : विष प्राशन करणं, गळफास घेणं, विहिरीत उडी टाकत जीव देणं, हाताची नस कापून घेणं, हे आणि असे कित्येक आत्महत्येचे प्रकार तुम्ही एकले असतील. स्वतःला जाळून घेत आयुष्य संपवणाऱ्यांच्याही बातम्या तुम्ही वाचल्या असतील. पण आता तर चक्क जिलेटीनच्या कांड्यांचा स्फोट करुन एकाने आत्महत्या (Amaravti Suicide News) केलीय. या घटनेमुळे एकच खळबळ माजील आहे. मासेमारी करण्यासाठी आणलेल्या जिलेटीनचा वापर करुन स्फोट घटवून आणत एका व्यक्तीने जीव दिलाय. अमरावतीत (Amravati Crime) घडलेल्या या घटनेनं सगळ्यांना मोठा धक्का बसलाय. राहत्या घरात एका व्यक्तीने स्फोट करुन आत्महत्या केली. या व्यक्तीने नेमकं असं का केलं, याची माहिती मिळू शकलेली नाही. आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीबाबत पोलिसांनी (Amaravati Police) नोंद करुन घेतली असून पुढील तपास केला जातोय.
कोण आहे आत्महत्या करणारी व्यक्ती?
रामू गायकवाड असं आत्महत्या करणाऱ्या इसमाचं नाव आहे. या व्यक्तीने राहत्या घरात आत्महत्या केली. मासेमारी करण्यासाठी या व्यक्तीने जिलेटीन आणलं होतं. त्याच जिलेटीनच्या कांड्याचं या व्यक्तीने स्फोट घडवून आणला आणि जीव दिला. मेळघाटमधील कलमखार गावात ही काळजाचा ठोका चुकवणारी घटना उघडकीस आलीय. या स्फोटाच्या आवाजने परिसर हादरुन गेला होता.
नेमकी का केली आत्महत्या?
रामू गायकवाड या व्यक्तीने आत्महत्या नेमकी काय केली? त्याला नैराश्य आलं होतं का? कुणाशी वाद झाला होता का? तो आर्थिक संकटात होता का? या सगळ्या अनुशंगाने आता पोलीस तपास करत आहेत. पोलिसांनी रामूचा मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवला असून पुढील कारवाई केली जातेय.