Video : बापाने पोरांना दारु पाजली, वरुन चकणाही भरवला! अमरवतीचा शॉकिंग व्हिडीओ एकदा बघाच

याच व्हिडीओत एक लहान मुलगीही दिसते. तिच्या हातात तर थेट बिअरची बाटली आहे.

Video : बापाने पोरांना दारु पाजली, वरुन चकणाही भरवला! अमरवतीचा शॉकिंग व्हिडीओ एकदा बघाच
संतापजनक...Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jul 23, 2022 | 1:41 PM

अमरावती : आई-बाप हे दोघंही मुलांच्या पालन पोषणात, मुलांना शिस्त लावण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. खरंतर आई मुलांचे लाड करतो, बाप पोरांना शिस्त लावतो, असा एक स्टिरीओटाईप समज आहे. तसं म्हटलं तर बापाने लपून छपून दारु पिण्याचे दिवसही केव्हाचेच मागे सरलेत. पण दिवस इतकेही पुढारलेपणाचे आलेले नाहीत, की बाप चक्क आपल्या चिमुरड्या पोरांसोबत दारु ढोसेल. इतकंच काय तर त्यांनाही दारु पाजेल! हे काही पुढारलेपणाचं लक्षण नक्कीच नाही. पण असा विचित्र प्रकार समोर आला आहे. एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झालाय. घटना अमरावतीची (Amravati Video) असल्याचं सांगितलं जातंय. एक बाप आपल्याच चिमुरड्या पोरांना दारु पाजतोय. एकूण पाच लोकं मिळून दारुची पार्टी (Liquor Party) करतायत. यात एक अल्पवयीन मुलगाही दिसतोय. एक लहान मुलगी आणि एक अगदीच चिमुरडा आहे. या सगळ्यांसोबत चिमुरड्यांचा बापही समोर बसलाय. तर पाचवा व्यक्ती व्हिडीओ काढतोय. दारु पार्टीचा हा झिंगाट व्हिडीओ काढताना सगळ्यांनाच मजा येत होती. पण आता हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर बाप नेमके आपल्या पोरांवर कसले संस्कार करतोय, यावरुन चर्चांना उधाण आलंय.

व्हिडीओमध्ये काय दिसतंय?

एकूण दोन मिनिटं 25 सेकंदांचा हा व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ व्हॉट्सअप ग्रूप आणि सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला आहे. एक माणूस खाली बसला. त्याच्यासमोर एक अल्पवयीन मुलगाही दारु पितोय. चकीत करणारी गोष्ट म्हणजे याच व्हायरल व्हिडीओमध्ये एका लहान मुलाच्या हातात दारुचा ग्लास दिसतोय. हे बाळ अगदीच लहान आहे. या मुलाला दारुचे घोट पाजताना नंतर त्याचा बाप थट्टा मस्करीत त्याला चकणाही भरवताना कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

हे सुद्धा वाचा

पाहा व्हिडीओ :

दरम्यान, याच व्हिडीओत एक लहान मुलगीही दिसते. तिच्या हातात तर थेट बिअरची बाटली आहे. बिटरचे घोट रिचवत ही मुलगी थेट बिअरच्या बाटलीतूनच दारु ढोसत असल्याचं दिसून आलंय. तर अल्पवयीन मुलगाही ग्लासातून दारु पिताना दिसून आलाय.

आता कारवाई अटळ?

धक्कादायक जन्मदात्या बापानेच आपल्या लहान मुलांना दारू पाजल्याचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एकच संताप व्यक्त केला जातोय. अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील कौंडण्यपूर परिसरातील ही संतापजनक घटना आहे. हा व्हायरल व्हिडिओ कौंडण्यपूर-अंजनसिंगी रोड वरील बार जवळील असल्याची शक्यता वर्तवली जातेय. आर्वी तालुक्यातील देऊरवाडा येथील पित्याचा कारनामा आता चर्चेचा विषय ठरतोय. आता या व्हायरल व्हिडीओनंतर या पित्यावर पोलीस कारवाई करणार का? असा प्रश्नही उपस्थित केला जातोय.

ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...