Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऑटोचालक रात्री ऑटो घेऊन गेला तो परतलाच नाही, सकाळी धक्कादायक घटना उघडकीस

राजकुमार घरी का आले नसावेत, याची घरच्यांना चिंता लागली. तेवढ्यात त्यांना दुःखद घटना कळली. आता राजकुमार घरी परत येणार नव्हते.

ऑटोचालक रात्री ऑटो घेऊन गेला तो परतलाच नाही, सकाळी धक्कादायक घटना उघडकीस
Follow us
| Updated on: Apr 21, 2023 | 4:09 PM

नागपूर : राजकुमार यादव हे ऑटोचालक आहेत. ते रात्रीच्या वेळी सीताबर्डी परिसरात ऑटो चालवतात. नेहमीप्रमाणे हे ऑटो घेऊन घरून गेले. पण, पहाटे घरी परतलेच नाही. त्यामुळे कुटुंबीयांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. राजकुमार घरी का आले नसावेत, याची घरच्यांना चिंता लागली. तेवढ्यात त्यांना दुःखद घटना कळली. आता राजकुमार घरी परत येणार नव्हते. या बातमीने कुटुंबीयांच्या पायाखालची जमीन सरकली. सकाळी राजकुमार यांचा मृतदेह दिसून आला. त्यांची दगडाने ठेचून हत्या केली होती.

दुकानाच्या पायरीवर सापडला मृतदेह

नागपूरच्या सीताबर्डी पोलीस स्टेशन हद्दीत एका ऑटो चालकाची हत्या करण्यात आली. पहाटेच्या सुमारास गुजरात हॉटेलसमोर एका दुकानाच्या पायरीवर झोपलेल्या अवस्थेत मृतदेह मिळाला. एका अज्ञात आरोपीने डोक्यावर दगड मारून हत्या करण्यात आल्याची माहिती आहे.

हे सुद्धा वाचा

राजकुमार यादव असे मृत ऑटो चालकाचे नाव (वय 50 वर्षे) आहे. सीताबर्डी येथील हनुमान गल्लीच्या गुजरात हॉटेलच्या जवळ ही घटना घडली. हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

दगडाने ठेचून हत्या

नागपूरचा सीताबर्डी परिसर हा नेहमी गजबजलेला परिसर असतो. हे मोठं मार्केट असून या ठिकाणी गर्दी असते. मात्र याच मार्केट परिसरामध्ये पहाटेच्या सुमारास दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची घटना पुढे आली. दिवस उजाडताच या ठिकाणी रक्तबंबाळ अवस्थेत मृतदेह आढळून आला.

रात्रीच्या वेळी चालवायचा ऑटो

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. मृतक हा ऑटो चालक असल्याचं पुढे येत आहे. तो रात्रीच्या वेळी ऑटो चालवायचा. मात्र याची हत्या कोणी आणि का केली याचा शोध आता पोलीस येत आहे. अशी माहिती डीसीपी राहुल मदने यांनी दिली.

सीताबर्डीसारख्या मार्केट एरियामध्ये ही हत्या झाली. त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. सुरक्षेचा प्रश्न सुद्धा निर्माण झालेला आहे. पोलीस वेगवेगळ्या मार्गाने आरोपीचा शोध घेत आहेत.

जळगावात दोन गटात तूफान राडा
जळगावात दोन गटात तूफान राडा.
नितेश राणेंकडून विधानपरिषदेत नार्वेकरांचा मित्र म्हणून उल्लेख
नितेश राणेंकडून विधानपरिषदेत नार्वेकरांचा मित्र म्हणून उल्लेख.
आरोपी गौरव अहुजाचा येरवडामध्ये मुक्काम वाढला
आरोपी गौरव अहुजाचा येरवडामध्ये मुक्काम वाढला.
तृप्ती देसाईंसोबत काय झाली चर्चा? धनंजय देशमुखांनी दिली प्रतिक्रिया
तृप्ती देसाईंसोबत काय झाली चर्चा? धनंजय देशमुखांनी दिली प्रतिक्रिया.
फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना! 'त्या' वक्तव्यानंतर सपकाळ आता म्हणताय...
फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना! 'त्या' वक्तव्यानंतर सपकाळ आता म्हणताय....
औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापलं, बघा कुठं, कसा झाला अंत?
औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापलं, बघा कुठं, कसा झाला अंत?.
स्वारगेट प्रकरणातील पीडितेनं DCM शिंदेंकडे केली एकच मागणी, म्हणाली...
स्वारगेट प्रकरणातील पीडितेनं DCM शिंदेंकडे केली एकच मागणी, म्हणाली....
'जिसे, निभा ना सकू..', अजितदादांची शायरीतून विरोधकांना टोलेबाजी
'जिसे, निभा ना सकू..', अजितदादांची शायरीतून विरोधकांना टोलेबाजी.
पटोलेंच्या ऑफरवर दादांनी उडवली खिल्ली, 'तुम्ही कशाचा पाठिंबा देताय...'
पटोलेंच्या ऑफरवर दादांनी उडवली खिल्ली, 'तुम्ही कशाचा पाठिंबा देताय...'.
औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तापलं; बजरंग दलाचं राज्यभरात आंदोलन
औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तापलं; बजरंग दलाचं राज्यभरात आंदोलन.