घराबाहेर गाडी ठेवत असाल तर सावध व्हा; पेट्रोलचोरीच्या घटनांमध्ये वाढ, मग पोलिसांनी…
पेट्रोल चोरीच्या घटना थांबत नव्हत्या. म्हणून पोलिसांनी सीसीटीव्हीचा आधार घेतला. लोकल इंटेलिजन्स वापरत पेट्रोल चोराचा शोध घेण्याचं ठरवलं. अखेर चोरट्या पोलिसांच्या हाती लागला.
नागपूर : शहरात पार्किंगची समस्या असते. त्यामुळे बरेच जण घरासमोर गाडी ठेवतात. रात्री घरासमोरील गाडीतून पेट्रोल चोरीच्या (Nagpur Crime) घटना नागपुरात वाढल्या होत्या. याच्या तक्रारी पोलिसांना येत होत्या. पण, चोर काही सापडत नव्हता. गाडीतून पेट्रोल रिकामे होत असल्याने नागरिक त्रस्त झाले होते. अशात एक चोरटा गजाआड झाला. तो घरासमोर उभ्या असलेल्या वाहनातून पेट्रोल चोरी करायची. आपल्या गाडीत भरून स्वतःची गाडी चालवायची. इतरांना सुद्धा स्वस्तात त्याची विक्री करायचा. अशा पेट्रोलचोराला पोलिसांनी (Nagpur Police) अटक केली. त्याने परिसरात पेट्रोल चोरीची दहशत माजवली होती. यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. केव्हा गाडीतील पेट्रोल खाली होईल याचा काही नेम नव्हता.
जरीपटका पोलिसांत तक्रारी
नागपूरच्या जरीपटका परिसरात गेल्या काही दिवसापासून घरासमोर उभे असलेल्या वाहनातून रात्रीच्या वेळी पेट्रोल चोरीला जात होते. अशा घटना मोठ्या प्रमाणात घडत असल्याची चर्चा संपूर्ण परिसरात झाली. अनेकांनी त्या संदर्भात पोलिसात तक्रार सुद्धा दिली. मात्र पेट्रोल चोरीच्या घटना थांबत नव्हत्या. म्हणून पोलिसांनी सीसीटीव्हीचा आधार घेत आणि लोकल इंटेलिजन्स वापरत पेट्रोल चोराचा शोध घेण्याचं ठरवलं. अखेर चोरट्या पोलिसांच्या हाती लागला.
इतरांना स्वस्त दरात विकायचा पेट्रोल
वाहनातून पेट्रोल काढून त्याची विक्री करणारा चोरटा. हा चोरटा घरासमोर उभे असलेल्या अनेक वाहनातून रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत पेट्रोल काढायचा. आपल्या गाडीच्या टँकमध्ये भरायचा. स्वतःची गाडी तर चालवायचा. पण इतरांना त्याची विक्री सुद्धा स्वस्त दरात करत होता. हा पाचपावली पोलीस स्टेशन हद्दीत राहणारा होता. त्या परिसरात सुद्धा अशाच घटना केल्या का याचा सुद्धा शोध पोलीस घेत आहेत. असं जरीपटक्याचे पोलीस निरीक्षक सतीश बोडखे यांनी सांगितलं.
अनेकांच्या गाडीतील पेट्रोल खाली
पेट्रोल महाग असल्याने अनेकांना पेट्रोल न परवडण्यासारखा आहे. त्यातही अशा प्रकारच्या चोरट्याने जर आपल्या गाडीतलं पेट्रोल खाली केलं तर मात्र मोठं नुकसान होतं. त्यामुळे नागरिकांनी याची पोलिसात तक्रार दिल्या. आता हा चोरटा पोलिसांच्या हाती लागला. या परिसरातील नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.