Bhandara Murder : 5 दिवसांनंतरही श्रद्धा सिडाम या 8 वर्षांच्या मुलीचे मारेकरी मोकाट! काय आहे प्रकरण?
भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यात 8 वर्षांच्या श्रद्धा सोबत नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर
भंडारा : भंडारा जिल्ह्यातील साकोली येथे घडलेल्या 8 वर्षीय मुलीच्या हत्याप्रकरणाचं (Shraddha Sidam Murder News) गूढ दिवसेंदिवस वाढत चाललंय. या हत्याप्रकरणी अद्यापही कुणाला अटक करण्यात आलेली नाही. तसंच या हत्येच्या पाच दिवसांच्या तपासानंतरही कोणतीही ठोस माहिती पोलिसांच्या हाती लागलेली नाही. दरम्यान, पोलिसांकडून या घटनेचा कसून तपास केला जातो आहे. मात्र या हत्येला पाच दिवस उलटले असले तरी श्रद्धाचे मारेकरी (Bhandara Murder) मोकाटच आहेत. त्यामुळे अनेक सवालही आता या हत्येप्रकरणी उपस्थित होऊ लागले आहेत.
श्रद्धा किशोर सिडाम या आठ वर्षांच्या मुलीचा मृतदेह पाच दिवसांपूर्वी जळालेल्या अवस्थेत आढळून आला होता. त्यानंतर एकच खळबळ उडाली होती. नेमकं तिच्या मृत्यूचं गूढ उकलण्याचं काम सुरु आहे. आठ वर्षीय चिमुकलीला ठार मारुन तिला तणसाच्या ढिगाऱ्यात जाळण्यात आलं, असा आरोपा केला जातो आहे.
ही धक्कादायक घटना समोर आल्यानंतर भंडारा जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. आता श्रद्धाच्या मारेकऱ्यापर्यंत पोहोचण्याचं आणि श्रद्धाच्या मृत्यूचं गूढ उकलण्याचं आव्हान पोलिसांसमोर उभं ठाकलंय.
साकोल तालुक्यातील पापडा गावात श्रद्धा सिडाम ही आठ वर्षांची मुलगी राहत होती. सोमवारी खेळायला गेल्यानंतर ती अचानक बेपत्ता झाली होती. त्यानंतर तिचा शेतातील तणसाच्या ढिगाऱ्यानं मृतदेह आढळून आला होता. हा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळून आल्यानंतर सगळ्यांनाच मोठा धक्का बसला होता.
श्रद्धाच्या हत्येप्रकरणी अजूनही कोणताही थांगपत्ता लागलेला नाही. श्रद्धाच्या मारेकऱ्यांना शोधण्याचं काम पोलिसांकडून सुरु आहे. मात्र त्यांच्या प्रयत्नांना अद्याप यश मिळू शकलेलं नाही. विविध दिशेनं पोलिसांकडून तपास केला जातोय. श्रद्धाच्या हत्येच्या सर्व शक्यताही पोलिसांकडून पडाळून पाहिल्या जात आहेत. आता भंडारा पोलिसांचं पथक पापडा गावात तळ ठोकून आहे. मात्र अद्यापही श्रद्धाच्या हत्येचं कारण नेमकं काय आहे, हे कळू शकलेलं नाही.