नागपुरात रेशन धान्याचा मोठा काळाबाजाराचं रॅकेट, तिघांना अटक, तब्बल 12 टन रेशनाचा तांदूळही जप्त!

Nagpur Crime : उत्तर नागपुरातील यशोधरा नगर परिसरात गुन्हे शाखेच्या पोलिसांनी एका आरोपीच्या घरावर छापा टाकला या छाप्यामध्ये सुमारे 12 टन रेशनचा तांदूळ जप्त केला.

नागपुरात रेशन धान्याचा मोठा काळाबाजाराचं रॅकेट, तिघांना अटक, तब्बल 12 टन रेशनाचा तांदूळही जप्त!
राशनमधील तांदळाचा काळाबाजार पुन्हा उघडकीस
Follow us
| Updated on: Jan 31, 2022 | 10:17 PM

नागपूर : नागपूर शहरातील रेशन धान्याचा काळाबाजार (Black Market of Rashan Rice in Nagpur) थांबण्याचे नाव घेत नाही. उत्तर नागपुरातील यशोदा नगर परिसरात गुन्हे शाखेच्या पोलिसांनी एका आरोपीच्या घरावर छापा टाकला या छाप्यामध्ये सुमारे 12 टन रेशनचा तांदूळ जप्त केला. कारवाईदरम्यान पोलिसांनी तीन आरोपींना अटक (3 people arrested) केली, तर तीन आरोपी फरार झाले. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून तांदूळ आणि रेशनच्या धान्याचा ट्रक असा एकूण 14 लाख 30 हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये जप्त करण्यात आलेल्या तांदळाची किंमत सुमारे 2 लाख रुपये आहे. यशोदा नगर (Yashoda Nagar) येथील वनदेवी नगर रेल्वे क्रॉसिंगजवळील एका घरात रेशनच्या धान्याचा काळाबाजार सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना शनिवारी मिळाली होती. त्यानंतर गुन्हे शाखा पोलीस विभागाच्या युनिट 5ने याप्रकऱमी कारवाई केली आहे. या व्यवसायात अनेक आरोपींचा सहभाग असून काही दिवसांपूर्वीच हा व्यवसाय सुरू करण्यात आला होता.

नागपूरच्या यशोधरा नगर पोलिस स्टेशनचे पीआय संजय जाधव यांनी या कारवाईबाबत अधिक माहिती दिली आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच नागपुरातील दिघोरीमध्येही मोठा कारवाई करत सार्वजनिक धान्य वितरण प्रणालीच्या तांदळाच्या गोण्या एका कारवाईमध्ये जप्त करण्यात आल्या होत्या. याप्रकरणीही तेव्हा तिघांना अटक करण्यात आली होती. सहा जानेवारीला ही कारवाई करण्यात आली होती. दरम्यान आता पुन्हा एकदा कारवाई करत तिघांना अटक करण्यात आली असून तिघेजण फरार आहेत.

काळाबाजार का केला जातो आहे?

सरकारकून अवघ्या दोन रुपये दराने मिळणारा तांदळाची भेसळ करुन मोठा काळाबाजार केला जात असल्याचं पोलिसांच्या कारवाईत अनेकदा समोर आलं आहे. दोन रुपयांना मिळणारा तांदूळ आठ ते दहा रुपये किलोप्रमाणे खरेदी करुन पुढे हाच तांदूळ चांगल्या तांदळात मिसळून बाजारात विक्री केला जात असल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे. याप्रकरणी सातत्यानं कारवाईतून मोठ्या प्रमाणात राशन दुकानातील तांदळाचा काळाबाजार होत असल्याचं वारंवार उघडकीस आलं असून, याप्रकरणातील मुख्य सूत्रधार नेमके कोण आहेत? राशन धान्याच्या काळाबाजाराचा मास्टरमाईंड कोण आहे? याचा शोध लावण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे.

संबंधित बातम्या :

सतीश उके, प्रदीप उके यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा, प्रकरण काय? एकेकाळी मांडली फडणवीसांविरोधात बाजू

आधी रेनॉल्ट डस्टरची काच फोडली, मग शंभर शंभरचे बंडल लंपास केले! नांदेडमध्ये चोरांचा सुळसुळाट

ज्यानं अ‍ॅसिड हल्ला केला, त्या पतीला सोडवण्यासाठी चक्क पत्नीची याचना! म्हणते ‘सोडा त्याला, नवराच तर आहे’

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.