थरारक! ओव्हरटेक करताना ट्रकला बोलेरोची धडक, पुलावर अधांतरी अडकलेल्या बोलेरोतून 6 प्रवाशांची सुखरुप सुटका

Chandrapur accident : चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर-राजुरा शहरांना जोडणाऱ्या वर्धा नदी पुलावर हा विचित्र अपघात घडला. प्रवाशांनी भरलेल्या बोलेरो वाहनाने ट्रकला ओव्हरटेक केला. ओव्हरटेक करताना ट्रकला बोलेरो कारने धडक दिली.

थरारक! ओव्हरटेक करताना ट्रकला बोलेरोची धडक, पुलावर अधांतरी अडकलेल्या बोलेरोतून 6 प्रवाशांची सुखरुप सुटका
भीषण अपघातImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Sep 07, 2022 | 10:30 AM

चंद्रपूर : विनायक मेटे, सायरस मिस्त्री (Cyrus Mistry Accident News) यांच्या अपघाती मृत्यूच्या घटना ताज्या असतानाचा आता अपघाताची आणखी एक थरारक घटना समोर आली आहे. चंद्रपूरमध्ये एक भीषण अपघात (Chandrapur accident) झाला. महिंद्र बोलेरो कार (Mahindra Bolero) आणि ट्रकची धडक झाली. या धडकेत पुलाचे कठडे तोडून अधांतरी अडकलं होतं. विशेष म्हणजे या बोलेरो कारमध्ये सहा प्रवासी तसेच अडकून राहिले होते. या सर्व प्रवाशांना वाचवण्यात यश आलं आहे. त्यामुळे काळ आला होता, पण वेळ आली नव्हती, याचा प्रत्यय कारमधील प्रवाशांना आलाय.

थोडक्यात निभावलं!

चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर-राजुरा शहरांना जोडणाऱ्या वर्धा नदी पुलावर हा विचित्र अपघात घडला. प्रवाशांनी भरलेल्या बोलेरो वाहनाने ट्रकला ओव्हरटेक केला. ओव्हरटेक करताना ट्रकला बोलेरो कारने धडक दिली.

हे सुद्धा वाचा

धडकेनंतर बोलेरो वाहन पुलाचे कठडे तोडून अधांतरी अडकलं होतं. अखेर पोलीस आणि नागरिकांनी तातडीने पोचत सहा प्रवाशांचे प्राण वाचविले. त्यामुळे थोडक्यात मोठा अनर्थ टळलाय.

या अपघातानंतर या अरुंद पुलावर वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. बल्लारपूर पोलिसांनी क्रेनच्या मदतीने अधांतरी अडकलेले बोलेरो वाहन बाहेर काढलं. दरम्यान तेलंगणा राज्याला जोडणाऱ्या या महत्त्वाच्या पुलावर अरुंद स्थितीमुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे.

चारवेळा आलेल्या महापुरानंतर सध्या इथल्या रस्त्याचीही दुरावस्था झाली आहे. अप्पर वर्धा धरणाची दारे उघडल्यामुळे सध्या वर्धा नदीला पूर आला आहे. अशा स्थितीत वाहन नदीत पडले असते, तर मोठी दुर्घटना झाली असती. मात्र स्थानिकांनी पोलिसांच्या मदतीने बचाव कार्य राबविल्याने जीवितहानी टळली.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.