एका मुलीने हत्या केली, दुसऱ्या मुलीने तक्रार दिली! चक्रावून टाकणाऱ्या हत्याकांडात भावजयही सामील

चंद्रपुरात मुलीनेच आईची हत्या केल्यानं खळबळ, हत्याकांडात मुलीला भावजयीनेही केली मदत, आईच्या हत्येचं गूढ उकलण्याचं पोलिसांना यश

एका मुलीने हत्या केली, दुसऱ्या मुलीने तक्रार दिली! चक्रावून टाकणाऱ्या हत्याकांडात भावजयही सामील
चंद्रपुरात खळबळजनक हत्याकांडImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Oct 07, 2022 | 11:33 AM

निलेश दहाट, TV9 मराठी, चंद्रपूर : पोटच्या मुलीने भावजयीची मदत घेत आपल्याच आईची हत्या (Chandrapur Murder) केली. चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही (Sindewahi) तालुक्यात ही धक्कादायक घटना घडली. या हत्येप्रकरणी पोलिसांनी (Chandrapur Crime News) मुलीसह भावजयीलाही अटक केली आहे. सध्या त्यांची कसून चौकशी केली जातेय. विशेष म्हणजे आई बेपत्ता असल्याची तक्रार दुसऱ्या मुलीने दिल्यानंतर हे सगळं प्रकरण उघडकीस आलंय. पोलिसांनी केलेल्या तपासानंतर या हत्याकांडाचा खळबळजनक घटनाक्रमही उघडकीस आलाय.

बेपत्ता झाल्यानं शंका

सिंदेवाही तालुक्यात नलेश्वर इथं तानाबाई सावसागडे ही 65 वर्षांची महिला राहत होती. आपली आई बेपत्ता असल्याची तक्रार या महिलेच्या मुलीने पोलिसात दिली होती. रंजना सोनावणे असं तक्रारदार महिलेचं नाव आहे. त्या आपली आई तानाबाई सावसागडे यांच्या शोधात होत्या. पण आई बेपत्ता असल्यानं त्यांनी सिंदेवाही पोलीस स्टेशन गाठलं आणि तक्रार दाखल केली.

पोलिसांनी तानाबाई यांच्या मुलीची आणि सुनेला ताब्यात घेतलं आणि त्यांची कसून चौकशी केली. या चौकशीतून धक्कादायक वास्तव पोलिसांच्या समोर आलं. शेतीच्या वादातून तानाबाई यांच्या मुलीनेच आईच्या हत्येचा कट रचला होता.

हे सुद्धा वाचा

का केली हत्या?

तानाबाई यांची मुलगी वंदना काते आणि सून चंद्रकला सावसागडे यांनी मिळून हत्येचा छडा लावला होता. आपल्या आईची वंदना आणि त्यांची भावजय चंद्रकला यांनी नाक आणि तोंड दाबून हत्या केली होती. पोलिसांच्या तपासात त्यांनी आपण केलेल्या कृत्याची कबुलीदेखील दिली. फक्त हत्या करुन त्या थांबल्या नाहीत, तर त्यांनी पुरावा नष्ट करण्यासाठी दोघींनी मिळून आईचा मृतदेह जमिनीत पुरला होता.

3 ऑक्टोबरला 65 वर्षीय तानाबाई यांची हत्या करण्यात आली होती. या हत्येचं कारण उलगडण्यातही पोलिसांना यश आलंय. शेतीच्या वादातून मुलही वंदना आणि भावजय चंद्रकला यांनी तानाबाई यांचा काटा काढला होता. या दोघींनाही सिंदेवाही पोलिसांनी अटक केली असून त्यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले...
आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले....
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?.
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?.
पंतप्रधान मोदी आज पाहणार हा चर्चेतला चित्रपट
पंतप्रधान मोदी आज पाहणार हा चर्चेतला चित्रपट.
सोनू सूद मदतीला धावला, अन् तिला पुन्हा मिळाली नवी दृष्टी
सोनू सूद मदतीला धावला, अन् तिला पुन्हा मिळाली नवी दृष्टी.
एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार का ? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं
एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार का ? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं.
बेईमानांचा पालापाचोळा उडाला, संजय राऊत-गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली
बेईमानांचा पालापाचोळा उडाला, संजय राऊत-गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली.
फक्त शरद पवार नव्हे तर ठाकरे गटालाही अजित पवारांचा धक्का ?
फक्त शरद पवार नव्हे तर ठाकरे गटालाही अजित पवारांचा धक्का ?.
ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवे वर वाहतूक कोंडी, मुंबईकर हैराण
ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवे वर वाहतूक कोंडी, मुंबईकर हैराण.