Nagpur Suicide : नागपूरमध्ये जोडप्याचा आत्महत्येचा प्रयत्न; पत्नीचा मृत्यू, पतीवर उपचार सुरु

कपिलनगरच्या बाबा दिपसिंग गुरूद्वारामागे पती प्रफुल सहारे आणि त्याची पत्नी रितू सहारे आपल्या दोन मुलांसह राहतात. मात्र आज सगळी जे घडलं ते पाहून संपूर्ण परिसर हादरला. पत्नी गळफास घेत लटकलेली तर पती विषारी औषध घेत पडलेल्या अवस्थेत आढळून आले. आज सकाळी साडेदहापर्यंत सुमारास दोघेही खोलीबाहेर न आल्याने प्रफुल्लच्या भाऊ प्रशांत याला शंका आली.

Nagpur Suicide : नागपूरमध्ये जोडप्याचा आत्महत्येचा प्रयत्न; पत्नीचा मृत्यू, पतीवर उपचार सुरु
नागपूरमध्ये जोडप्याचा आत्महत्येचा प्रयत्नImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 10, 2022 | 1:03 AM

नागपूर : अज्ञात कारणावरुन पती-पत्नीने आत्महत्या (Suicide) केल्याची घटना नागपूरच्या कपिलनगर परिसरात घडली आहे. पत्नीने गळफास घेत तर पतीने विष प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केला. यात पत्नीचा जागीच मृत्यू (Death) झाला तर पतीवर रुग्णालयात उपचार (Treatment) सुरू आहेत. याप्रकरणी कपिलनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. दोघांची आत्महत्या आहे की घातपात याचा तपास कपिलनगर पोलीस करत आहेत. प्रफुल सहारे आणि रितू सहारे अशी पती-पत्नीची नावे आहेत. पती पत्नीने आत्महत्या केली की हा घातपात आहे याचा खुलासा पोस्टमार्टम रिपोर्टनंतर आणि पतीला शुद्ध आल्यानंतरच होऊ शकेल. मात्र या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळी उशिरपर्यंत दरवाजा उघडला नाही म्हणून भावाने तोडला

कपिलनगरच्या बाबा दिपसिंग गुरूद्वारामागे पती प्रफुल सहारे आणि त्याची पत्नी रितू सहारे आपल्या दोन मुलांसह राहतात. मात्र आज सगळी जे घडलं ते पाहून संपूर्ण परिसर हादरला. पत्नी गळफास घेत लटकलेली तर पती विषारी औषध घेत पडलेल्या अवस्थेत आढळून आले. आज सकाळी साडेदहापर्यंत सुमारास दोघेही खोलीबाहेर न आल्याने प्रफुल्लच्या भाऊ प्रशांत याला शंका आली. त्याने त्यांच्या खोलीचे दार ठोठावले. मात्र, प्रतिसाद मिळत नसल्याने त्याने दार तोडले. यावेळी प्रफुल्ल सहारे यांच्या तोडांतून फेस येत होता. याशिवाय वहिनी रितू सहारे या ओढणीच्या साहायाने गळफास घेतल्याने लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्या. या प्रकाराने घरात एकच खळबळ उडाली.

सकाळी दोघांमध्ये भांडण झाल्याची माहिती

याची माहिती कपिलनगर पोलिसांना देण्यात आली. त्यांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत रितू सहारे यांचा मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. तसेच प्रफुल्ल सहारे यास रुग्णालयात दाखल करण्यात आले. याबाबत प्राथमिक चौकशी केली असता, आज सकाळी दोघांमध्ये काही कारणाने भांडण झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यातून प्रफुल्लने त्याच्या पत्नीची हत्या करीत स्वतः विष प्राशन केल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, त्याच्यावर उपचार सुरू असल्याने अद्याप कोणते कारण आहे हे स्पष्ट झाले नाही. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे. (Couple attempts suicide in Nagpur; Wife dies, husband begins treatment)

हे सुद्धा वाचा

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.