कांबळे दुहेरी हत्याकांड प्रकरण, जिल्हा सत्र न्यायालयाचा मोठा निर्णय

आई आणि मुलगी बेपत्ता झाल्यावर रविकांत कांबळे यांनी हुडकेश्वर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली होती. पोलिसांनी तपासात आजी आणि नात घराशेजारील एका किराणा दुकानात शेवटचे दिसल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

कांबळे दुहेरी हत्याकांड प्रकरण, जिल्हा सत्र न्यायालयाचा मोठा निर्णय
Follow us
| Updated on: Jul 14, 2023 | 11:01 PM

नागपूर : दिघोरी परिसरात पत्रकार रविकांत कांबळे कुटुंबासह राहतात. या कुटुंबात आई-वडील, रविकांत यांची पत्नी आणि दोन चिमुकल्या जुडवा मुली राशी आणि खुशी राहत होते. 17 फेब्रुवारी 2018 रोजी संध्याकाळपासून आजी उषा कांबळे आणि दीड वर्षीय चिमुकली राशी कांबळे या बेपत्ता झाल्या होत्या. आई आणि मुलगी बेपत्ता झाल्यावर रविकांत कांबळे यांनी हुडकेश्वर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली होती. पोलिसांनी तपासात आजी आणि नात घराशेजारील एका किराणा दुकानात शेवटचे दिसल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

दोघांच्या हत्येची कबुली

हे किराणा दुकान शाहू यांचे होते. संशयाच्या आधारावर पोलिसांनी किराणा दुकानाचे मालक गणेश शाहू यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली. सुरुवातीला गणेश शाहू पोलिसांची दिशाभूल करीत होता. मात्र पोलिसी खाक्या दाखवताच त्याने दोघांचीही हत्या केल्याचे कबूल केले.

गणेश शाहू यांने 56 वर्षीय उषा कांबळे आणि दीड वर्षीय राशी कांबळेचा खून केल्याची कबुली दिली. या हत्याकांडाने त्यावेळी खळबळ उडवून दिली होती. ज्यानंतर सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांनी या खटल्याचे कामकाज पाहिले.

मृतदेह पोत्यात भरले

उषा कांबळे आणि आरोपी गणेश शाहू यांचा भिशीच्या पैशावरून बऱ्याच दिवसापासून वाद सुरू होता. या वादातूनच हे हत्याकांड झाल्याचे तपासात निष्पन्न झाले. धारदार शस्त्राने दोघांचीही हत्या करण्यात आली होती. रात्रीच्या अंधारात दोघांचे मृतदेह पोत्यात ठेवून चारचाकी वाहनाने उमरेड रोडवरच्या निर्जन नाल्यात फेकून देण्यात आले होते. अनेक प्रकरणात दुसऱ्यासाठी लढणाऱ्या पत्रकाराला आजच्या न्यायालयाच्या निर्णयानंतर स्वतः न्याय मिळाला एवढे खरे.

चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप.
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त.
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट.
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.