Nagpur Murder | नागपुरात अवैध दारुविक्रीवरून वाद, नीलडोह परिसरात युवकावर सपासप वार, अल्पवयीन आरोपी ताब्यात

चेतनचा सतरा वर्षाच्या मुलासोबत वाद होता. तो मित्रांसोबत बसला असता चेतन आला. त्याने तू मला जीवे मारणार आहेस का, असं म्हणत वाद घातला. सायंकाळी चेतन दोन-तीन मित्रांसोबत अल्ववयीन मुलाच्या घरी आला. त्याने धमकी देत घराबाहेर बोलावले. अल्पवयीन मुलासोबत पुन्हा वाद घातला. आरोपीनं घरातून येताना चाकू आणला. चेतनच्या पोटावर सपासप वार केले.

Nagpur Murder | नागपुरात अवैध दारुविक्रीवरून वाद, नीलडोह परिसरात युवकावर सपासप वार, अल्पवयीन आरोपी ताब्यात
नीलडोह परिसरात युवकाचा घेतला जीव
Follow us
| Updated on: Jun 16, 2022 | 9:44 AM

नागपूर : नागपूरच्या एमआयडीसी (MIDC) पोलीस ठाण्याअंतर्गत निलडोह (Nildoh) परिसरात हत्या करण्यात आली. चेतन अंकुश मोहर्ले असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. मृतक आणि आरोपी दोघांचीही गुन्हेगार पार्श्वभूमीवर असून अवैध दारू (Alcohol) विक्री करायचे. दारूच्या देवाणघेवाणीतून हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आरोपी अल्पवयीन असून पोलिसांच्या ताब्यात आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यातील जुन्या नीलडोह परिसरात बुधवारी रात्री एका युवकाची हत्या करण्यात आली. अवैध दारू विक्रीच्या प्रकरणातून त्याची हत्या झाल्याची माहिती आहे. एमआयडीसी परिसर अवैध धंद्यामुळे नेहमी चर्चेत असते. बुधवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास नीलडोह परिसरातील पुलाजवळ अल्पवयीन आरोपींनी अवैध दारू विक्रेता चेतन मोहर्ले याची हत्या केली. मृतक चेतन आणि आरोपींचा अवैध दारूच्या देवाणघेवाणीवरून वाद झाला होता.

अशी घडली घटना

चेतनचा सतरा वर्षाच्या मुलासोबत वाद होता. तो मित्रांसोबत बसला असता चेतन आला. त्याने तू मला जीवे मारणार आहेस का, असं म्हणत वाद घातला. सायंकाळी चेतन दोन-तीन मित्रांसोबत अल्ववयीन मुलाच्या घरी आला. त्याने धमकी देत घराबाहेर बोलावले. अल्पवयीन मुलासोबत पुन्हा वाद घातला. आरोपीनं घरातून येताना चाकू आणला. चेतनच्या पोटावर सपासप वार केले. यात चेतन रक्तबंबाळ झाला. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. तोपर्यंत चेतनवर बरेच चाकूचे घाव बसले होते. जखमी अवस्थेत चेतनला रुग्णालयात दाखल करण्यात आले. यात चेतनचा मृत्यू झाला.

चेतनवर चाकूचे वार

आरोपींनी चेतनवर घातक शस्त्र आणि दांड्यांनी वार केले. पोलिसांनी गंभीर जखमी अवस्थेत चेतनला लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी चेतनला तपासून मृत घोषित केले. चेतनवर एमआयडीसी ठाण्यात यापूर्वी गुन्हा दाखल असल्याचीही माहिती आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक कल्याणी हुमने यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे. गुंड प्रवृत्तीचे लोकं असल्यास त्यांचा शेवटही असाच भयानक होतो. मृत्यू हे अटळ सत्य असलं तरी बऱ्याच प्रमाणात कसं जायचं हे बहुतेकाच्या हातात असते. दादागिरी करणार असेल तर त्याचा शेवटही असाच भयानक होतो, हे या घटनेवरून दिसून येते.

हे सुद्धा वाचा

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.