अल्पवयीन मुलीशी जवळीकता साधली, त्यानंतर सुरू केली लूट, अखेर आरोपी पोलिसांच्या जाळ्यात
नाहीतर तुझे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करील.
नागपूर : नागपूरच्या पाचपावली परिसरात राहणाऱ्या सोळा वर्षीय मुलीसोबत कुणाल यादव नावाच्या आरोपीने स्नॅपचॅटवरून ओळख केली. ओळखीनंतर भेटण्यास बोलवले. दोघेही भेटल्यानंतर त्यांच्यात मैत्री झाली. मैत्री प्रेमात बदलली. दोघांमध्ये जवळीकता वाढली. वारंवार भेटून जवळीकता वाढवल्यामुळे दोघांनी एकमेकांसोबत वेगवेगळ्या अवस्थेत फोटो सुद्धा काढले. मी एमपीएससीचा अभ्यास करतो. मला काही पैशांची गरज आहे, असं सांगत मुलीकडून त्याने पैसे उकळायला सुरुवात केली.
मात्र मुलीने नंतर पैसे देण्यास त्याला नकार दिला. तेव्हा त्याने तिच्यासोबत जवळीकता साधलेले जे फोटो होते त्या फोटोवरून तिला ब्लॅकमेल केले. तुझ्याकडे पैसे नाही तर मग तुझ्या आईचे दागिने मला आणून दे. नाहीतर तुझे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करील.
तुझ्या आई वडिलांना दाखवेल अशी धमकी दिली. मुलीने आईचे दागिने त्याच्या स्वाधीन केले. आई जेव्हा स्वतःचे दागिने बघायला गेली तेव्हा ते दिसले नाही. तिने मुलीला विचारलं तेव्हा मुलीनं सगळा प्रकार आईला सांगितला.
त्यावरून आई-वडिलांनी पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली. अशी माहिती पाचपावली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय मेंढे यांनी दिली.
आरोपी हा कुख्यात गुंड आहे. त्याने त्या मुलीच्या बालीशपणाचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला. मात्र शेवटी तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला. प्रेम करताना आपले डोळे उघडे ठेवले पाहिजे. हे या घटनेवरून आणखी एकदा सिद्ध झालं आहे.