परराज्यातून टोळी यायची, नागपुरात मोबाईल चोरायची, या देशात नेऊन विक्री…

आता ती मोबाईल चोरट्यांची टोळी नागपुरात सक्रिय झाली आहे. या माहितीवरून पोलिसांनी यांचा शोध घेतला. ही टोळी ऑटोमोटिव्ह चौक परिसरात एक किरायाची खोली घेऊन राहत होती. त्या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकला.

परराज्यातून टोळी यायची, नागपुरात मोबाईल चोरायची, या देशात नेऊन विक्री...
परराज्यातील मोबाईल चोरटे जेरबंद
Follow us
| Updated on: Sep 16, 2022 | 10:19 PM

नागपूर गुन्हे शाखा पोलिसांनी मोबाईल चोरांच्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश केला. ही टोळी झारखंड -बिहारमधून येऊन वेगवेगळ्या ठिकाणी चोरी करायची. चोरी केलेले मोबाईल बांगलादेशमध्ये विकायचे. या टोळीकडून 16 लाख रुपये किमतीचे 72 मोबाईल पोलिसांनी जप्त केले. यामध्ये आणखी आरोपी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

नागपुरात मोबाईल चोरीच्या घटना वाढल्या होत्या. गुन्हे शाखा पोलिसांनी मोबाईल चोरट्यांवर आपलं लक्ष केंद्रित केलं. पोलिसांना गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार, एक टोळी नागपुरात मोबाईल चोरीसाठी सक्रिय झाली आहे. ती वेगवेगळ्या राज्यात जाऊन मोबाईलची चोरी करते.

किरायाच्या खोलीत छापा

आता ती मोबाईल चोरट्यांची टोळी नागपुरात सक्रिय झाली आहे. या माहितीवरून पोलिसांनी यांचा शोध घेतला. ही टोळी ऑटोमोटिव्ह चौक परिसरात एक किरायाची खोली घेऊन राहत होती. त्या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकला.

हे सुद्धा वाचा

पोलिसांनी सहा जणांना अटक केली. त्यामध्ये एका अल्पवयीन मुलाचा सुद्धा समावेश आहे. खोलीची झडती घेतली असता वेगवेगळ्या कंपनीचे 72 मोबाईल या ठिकाणी सापडले. या मोबाईलची किंमत 16 लाखांच्या घरात आहे. यामध्ये आणखीसुद्धा आरोपी असण्याची शक्यता पोलीस वर्तवत आहेत. अशी माहिती गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस निरीक्षक किशोर परबते यांनी दिली.

गर्दीच्या ठिकाणी चोरायचे मोबाईल

बिहारमधून निघून ही टोळी एक एक शहर गाठत होती. गर्दीचे ठिकाण शोधत होती. मोबाईल चोरीसाठी सावज हेरत होती. लहान मुलांच्या माध्यमातून त्या मोबाईलची चोरी करायची. लगेच दुसऱ्याकडे मोबाईल पास करत होती. त्या ठिकाणाहून पळ काढत.

अशाप्रकारे यांनी अनेक चोऱ्या केल्यात. हे सगळे मोबाईल झारखंड आणि बिहारमार्गे बांगलादेशमध्ये जात होते. तिथं कमी दरात विक्री करण्यात येत होती. त्यामुळे या टोळीचे मुळं कुठपर्यंत आहेत, याचा शोध पोलीस घेत आहेत.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.