चक्क अंगणात लावली गांजाची झाडं, चोरीछुपे करत होता विक्री

पथकाने छापा टाकला असता अंगणात 13 फूट उंच गांजाची 15 झाडे आढळली.

चक्क अंगणात लावली गांजाची झाडं, चोरीछुपे करत होता विक्री
चक्क अंगणात लावली गांजाची झाडं, चोरीछुपे करत होता विक्री Image Credit source: t v 9
Follow us
| Updated on: Oct 03, 2022 | 6:04 PM

गणेश सोनोने, Tv9 मराठी, प्रतिनिधी,  अकोला : पातूर शहरातील भीमनगरात (Bhimnagar in Patur town) राहणाऱ्या एका व्यक्तीने घराच्या मागील अंगणात चक्क गांजाची झाडं ( ganja trees) लावली. त्यानं 15 झाडांची लागवड केल्याची माहिती पोलीस अधीक्षक (Superintendent of Police) यांच्या विशेष पथकाला मिळाली. पथकाने छापा टाकला असता अंगणात 13 फूट उंच गांजाची 15 झाडे आढळली. पोलिसांनी 21 किलो वजनाची गांजाची झाडे जप्त केली आहेत.

पातूर शहरातील भीम नगरात एकाने अंगणात गांजाची झाडे लागवड केली. अशी माहिती विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील यांना मिळाली. त्यांच्या पथकाने शेख कय्युम शेख यांच्या घरी छापा टाकला.

15 हिरवीगार झाडे जप्त

शेख याच्या घराच्या अंगणातील 13 फूट उंचीची गांजाची 15 हिरवीगार झाडे जप्त केली. या झाडांचे एकूण वजन 21 किलो आहे. त्याची किंमत 1 लाख 5 हजार रुपये आहे.

आरोपी शेख कय्युम याने घरात गांजाच्या झाडांची लागवड करून त्याचे संगोपन करीत होता. झाडाची पाने वाळवून नंतर तो त्याची ग्राहकांना चोरीछुपे पद्धतीने अवैध विक्री करीत होता.

एनडीपीएस अॅक्टअंतर्गत गुन्हा

आरोपी शेख कय्युम शेख करीम याच्याविरुद्ध पातूर पोलीस ठाण्यात एनडीपीएस ऍक्ट कलम 20 ब नुसार गुन्हा दाखल केला आहे. गांजाची झाडे विकणे हा गुन्हा आहे. परंतु, काही लोकं चोरीछुपे या झाडांची लागवड करतात. त्यानंतर त्याची छुपी विक्री केली जाते. पोलिसांना याची माहिती मिळाल्यास कारवाई केली जाते.

पोलिसांपर्यंत तक्रार न गेल्यास हा गांजाच्या झाडांची विक्री करण्याचा व्यवसाय सुरू असतो. त्यामुळं चोरट्यांचं फावतं. जास्त नफा मिळत असल्यानं ही चोरीझुपे लागवड केली जाते.

Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.