डोक्यातील गाठीवर दहा हजारात शस्त्रक्रिया, तरुणीचा मृत्यू, बोगस डॉक्टरला अटक

फक्त दहा हजार रुपयात आरोपीने तरुणीच्या डोक्यावर शस्त्रक्रिया केली होती. या प्रकारामुळे गोंदिया जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट असल्याचं समोर आलं आहे.

डोक्यातील गाठीवर दहा हजारात शस्त्रक्रिया, तरुणीचा मृत्यू, बोगस डॉक्टरला अटक
Gondia Bogus Doctor arrest
Follow us
| Updated on: Jul 08, 2021 | 12:03 PM

गोंदिया : बोगस डॉक्टरने तरुणीच्या डोक्यावर शस्त्रक्रिया केल्यानंतर तिचा मृत्यू झाल्याचा खळबळजनक प्रकार गोंदियात उघडकीस आला आहे. फक्त दहा हजार रुपयात शस्त्रक्रिया करणारा बोगस डॉक्टर समीर रॉय याला पोलिसांनी अटक केली आहे. गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यातील साखरीटोला भागात ही गंभीर घटना घडली. (Gondia Bogus Doctor Dr Sameer Roy arrested for operation on girl’s head)

फक्त दहा हजार रुपयात आरोपीने तरुणीच्या डोक्यावर शस्त्रक्रिया केली होती. या प्रकारामुळे गोंदिया जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट असल्याचं समोर आलं आहे. दमयंती सुरजलाल धुर्वे असे मयत तरुणीचे नाव असून समीर रॉय असे बोगस डॉक्टरचे नाव आहे.

नेमकं काय घडलं?

साखरीटोला येथे समीर रॉय हा डॉक्टरीचा व्यवसाय करतो. देवरी तालुक्यातील मुरदोली येथील दमयंती सुरजलाल धुर्वे या तरुणीच्या डोक्यावर मागील भागात गाठ होती. त्या गाठीवर डॉक्टर रॉयने कोणतीही परवानगी किंवा शस्त्रक्रियेचे कोणतेही ज्ञान नसताना 10 हजार रुपये घेऊन शस्त्रक्रिया केली.

उपचारादरम्यान तरुणीचा मृत्यू

दुसऱ्या दिवशी तरुणीला उलट्या सुरु झाल्या, पण गॅसेसची समस्या असेल असे सांगून त्याने तिला पिटाळले. मात्र प्रकृती चिंताजनक झाल्यावर गोंदियातील खाजगी हॉस्पिटलमध्ये तिला दाखल करण्यात आले, परंतु उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे. तक्रारीवरून बोगस डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सालेकसा पोलिसांना बोगस डॉक्टरला अटक केली असून पुढील तपास सालेकसा पोलीस करत आहेत.

संबंधित बातम्या :

अपात्र MBBS डॉक्टरकडून मूळव्याधीच्या एक हजार शस्त्रक्रिया, दादरमधून अटक

मृत रुग्ण जिवंत असल्याचे भासवून दोन दिवस उपचार, सांगलीत आणखी एका डॉक्टरला अटक

(Gondia Bogus Doctor Dr Sameer Roy arrested for operation on girl’s head)

छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.