‘लिव्ह इन’मध्ये राहणाऱ्या प्रेयसीची प्रियकराकडून हत्या, दोन मित्रांसह जंगलात नेऊन जीव घेतला

लग्नाचा तगादा लावल्याने प्रियकराने प्रेयसीचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह जंगलात फेकल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी चिचगड पोलिसांनी आरोपी प्रियकरासह त्याच्या दोन साथीदारांना अटक केली आहे.

'लिव्ह इन'मध्ये राहणाऱ्या प्रेयसीची प्रियकराकडून हत्या, दोन मित्रांसह जंगलात नेऊन जीव घेतला
गोंदियात गर्लफ्रेण्डच्या हत्ये प्रकरणी प्रियकरासह तिघे जेरबंद
Follow us
| Updated on: Jul 20, 2021 | 12:03 PM

गोंदिया : प्रेयसीची हत्या करुन तिचा मृतदेह जंगलात फेकल्या प्रकरणी 26 वर्षीय प्रियकराला अटक करण्यात आली आहे. गोंदिया जिल्ह्यात 25 ते 30 वर्षीय तरुणीचा मृतदेह सापडला होता. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असलेल्या जोडप्यातील तरुणीने लग्नाचा तगादा लावल्याने आपल्या दोन मित्रांसह जंगलात नेऊन तिची हत्या केल्याचे प्रियकराने कबूल केले.

गोंदिया जिल्ह्यातील चिचगड पोलीस ठाण्या अंतर्गत येणार्‍या ढासगड येथे 25 ते 30 वर्षीय तरुणीच्या गळ्यावर, डोक्यावर धारदार शस्त्रांनी वार करुन तिची हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या हत्या प्रकरणाचा उलगडा करण्यात चिचगड पोलिसांना यश आले. प्रियकराने प्रेयसीचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह जंगलात फेकल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी चिचगड पोलिसांनी आरोपी प्रियकरासह त्याच्या दोन साथीदारांना अटक केली आहे.

प्रियकरासह दोघांना अटक

समीर असलम शेख (वय 26, रा. बावलानगर बुटीबोरी, जि. नागपूर) असे प्रियकराचे नाव आहे. तर आसिफ शेरखान पठाण (वय 35, रा. बाबा मस्तान शॉ वॉर्ड भंडारा) आणि प्रफुल पांडुरंग शिवणकर (वय 25, रा. दुधा, मांगली, जि. नागपूर) यांना त्यांच्या घरातून ताब्यात घेण्यात आले आहे.

काय आहे प्रकरण?

एका अनोळखी तरुणीचा मृतदेह ढासगडकडे (पिपरखारी) जाणार्‍या रस्त्याच्या बाजूला जंगलात पडलेला आहे, अशी माहिती चिचगड पोलिसांना 23 जून रोजी सकाळी 10.50 वाजता मिळाली होती. या माहितीच्या आधारावर चिचगड पोलीस आपल्या ताफ्यासह ढासगड येथील घटनास्थळी गेले असता ढासगड मंदिराकडे जाणार्‍या डांबरी रस्त्यापासून अंदाजे 25 फुटावर रस्त्याच्या बाजूला अंदाजे 25 ते 30 वर्षीय अनोळखी महिलेचा मृतदेह रस्त्यावरुन ओढत नेऊन जंगलात टाकण्यात आल्याचे दिसून आले.

नेमकं काय घडलं?

धारदार शस्त्रांनी तिच्या गळ्यावर, डोक्यावर वार करुन ठार मारण्यात आल्याचेही दिसून आले होते. या प्रकरणात फिर्यादी गणेशराम सीताराम मारगाये (वय 67, रा. मोहाडी, चिचगड पोलीस ठाणे, ता. देवरी) यांच्या तक्रारीवरून चिचगड पोलिसांनी कलम 302 अन्वये गुन्हा दाखल केला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक यांनी तपासाचे आदेश दिले.

लग्नाचा तगादा ठरला जीवघेणा

महिलेच्या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी तिचे फोटो सोशल मीडिया आणि पत्रकं वाटून शोध सुरु करण्यात आला. दरम्यान खबरीकडून 18 जुलै रोजी संबंधित महिला आणि आरोपींबाबत खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली. समीर असलम शेखला नागपूरवरुन ताब्यात घेण्यात आले. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असताना प्रेयसीने लग्नाचा तगादा वाढलला होता. त्यामुळे आपल्या दोन मित्रांसह तिला ढासगढ़ जंगलात नेऊन तिची हत्या केल्याचे प्रियकराने कबूल केले आहे. या प्रकरणी 3 आरोपी अटकेत असून पुढील तपास पोलिस करत आहेत.

संबंधित बातम्या :

आईच्या छातीत स्क्रू ड्रायव्हर खुपसला, ठाण्यात हत्येचा थरार, मुलाला अटक

भावालाही मुलगी झाली, आपल्या लेकीचे लाड कोण करणार? यवतमाळमध्ये नणंदेने वहिनीला जाळले

(Gondia Boyfriend arrested with two friends for killing Live in partner Girlfriend in jungle)

दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.
अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर
अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर.
'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?
'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?.
आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी
आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी.
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?.
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?.
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.