ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशांच्या मोबाईलवर डल्ला, 20 वर्षीय अट्टल चोरट्याला अटक

प्रवाशांच्या झोपेचा गैरफायदा घेत चालत्या रेल्वेमध्ये त्यांच्या मोबाईलवर हात साफ करणाऱ्या अट्टल मोबाईल चोरट्याला गोंदिया रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी अटक केली.

ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशांच्या मोबाईलवर डल्ला, 20 वर्षीय अट्टल चोरट्याला अटक
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Jul 24, 2021 | 11:33 AM

गोंदिया : प्रवाशांच्या झोपेच्या फायदा घेत त्यांच्या मोबाईलवर डल्ला मारणाऱ्या अट्टल चोरट्याला अटक करण्यात आली आहे. गोंदियामध्ये रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी चोराला बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून चार महागडे मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत.

प्रवाशांच्या झोपेचा गैरफायदा घेत चालत्या रेल्वेमध्ये त्यांच्या मोबाईलवर हात साफ करणाऱ्या अट्टल मोबाईल चोरट्याला गोंदिया रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी अटक केली. 20 वर्षीय बलजीत सिंग (राहणार कोरबा छत्तीसगढ़) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडे चार महागडे मोबाईल सापडले.

नेमकं काय घडलं?

गोंदिया रेल्वे स्टेशन परिसरात अनेक प्रवाशांचे सामान, महागडे मोबाईल चोरीला गेल्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली होती. याला आळा घालण्यासाठी गोंदिया रेल्वे सुरक्षा दलाच्या टीमने पेट्रोलिंगवर असतांना यशवंतपुर-कोरबा ट्रेनमध्ये आरोपी पकडले. तो संशयास्पद स्थितीत फिरत असताना पोलिसांनी त्याला हटकले. त्याने उडवाउडवीची उत्तरं दिल्यावर पोलिसांनी त्याची तपासणी केली, तेव्हा त्याच्याकडे 4 महागडे मोबाईल आढळले.

कसून चौकशी केली असता त्याने मोबाईल चोरी केल्याचा गुन्हा कबूल केला आहे. लगेच त्याला ताब्यात घेत मोबाईल मालकांशी संपर्क करत त्यांचे मोबाईल त्यांना परत करण्यात आले आहेत. आरोपी विरुद्ध रेल्वे कायदाच्या कलम 379 नुसार गुन्हा नोंद करत अटक करण्यात आली आहे. पुढील तपास रेल्वे पोलिस करत आहेत.

कोल्हापुरात पाच चोर पकडले, 10 गुन्हे उघड झाले

दुसरीकडे, इचलकरंजी शहर परिसरात चोरीच्या घटना वाढून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. इचलकरंजी शहरातील शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेतलेल्या पाच संशयित आरोपींकडून विविध ठिकाणचे चोरीचे 10 गुन्हे उघडकीस आणले. तसेच आरोपींकडून सुमारे 6 लाख 68 हजार किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला असल्याची माहिती पोलिस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांनी पत्रकार बैठकीत दिली.

संबंधित बातम्या :

भंगारात सापडलेल्या स्कॉचच्या बाटल्यांतून बनावट मद्याची विक्री, मुंबईच्या दोघांना पुण्यात अटक

ज्येष्ठ नागरिकांना बोलण्यात गुंतवून दागिने-पैशांची चोरी, मिरा रोडमधून मायलेकाला अटक

(Gondia Railway Police arrested 20 years old thief for stealing mobile phones)

... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.