Nagpur Crime | नागपुरात आजोबाने बनविले नातीनलाच वासनेची शिकार; 13 वर्षीय पीडितेच्या आईने प्रत्यक्ष पाहिला नको तो प्रकार

कपिलनागर पोलीस स्टेशन हद्दीत आजोबानेच आपल्या 13 वर्षीय नातीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. पोलिसांनी आरोपी आजोबाला अटक केली.

Nagpur Crime | नागपुरात आजोबाने बनविले नातीनलाच वासनेची शिकार; 13 वर्षीय पीडितेच्या आईने प्रत्यक्ष पाहिला नको तो प्रकार
कपिलनागर पोलीस स्टेशन हद्दीत आजोबानेच आपल्या 13 वर्षीय नातीवर अत्याचार
Follow us
| Updated on: Jun 07, 2022 | 2:57 PM

नागपूर : कपिलनगर ठाण्याच्या परिसरात 62 वर्षीय आजोबानेच आपल्या नातीलाच वासनेची शिकार बनविल्याची खळबळजनक घटना घडली. रेल्वेतून निवृत्त आजोबाच आपल्या 13 वर्षीय नातीनसोबत शारीरिक संबंध करीत असल्याचे उघडकीस आले आहे. पीडित मुलीची आई गर्भवती (Pregnant) असल्यामुळे आपल्या वडिलांच्या घरी एप्रिल 2021 मध्ये प्रसूतीसाठी आली होती. गर्भवती असल्यामुळे तिची आई आपल्या मुलीला आजोबाजवळ राहण्यासाठी पाठवत होती. काही दिवसांपूर्वी आईने मुलीला त्यांच्यासोबत आपत्तीजनक स्थितीत पाहिले. त्यानंतर आईने मुलीला विश्वासात घेऊन चौकशी केली. मुलीने घडलेला प्रकार आईला सांगितला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी आजोबाला अटक केली. अशी माहिती कपीलनगर (Kapilnagar) पोलीस ठाण्याचे निरीक्षक अमोल देशमुख (Amol Deshmukh) यांनी सांगितलं.

मुलीच्या आईला दिसले भयानक चित्र

कपिलनागर पोलीस स्टेशन हद्दीत आजोबानेच आपल्या 13 वर्षीय नातीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. पोलिसांनी आरोपी आजोबाला अटक केली. पीडित अल्पवयीन मुलीला आई, वडील, एक भाऊ, एक बहीण आहे. पीडिता सर्व भावंडामध्ये मोठी आहे. वडील खासगी काम करतात. तर, आई गृहिणी आहे. गेल्या वर्षांपासून पीडितेचे आई-वडील आणि सर्व कुटुंब आईच्या माहेरी राहायला गेले. घरचे सर्वच झोपले होते. रात्री आईला जाग आली. तिच्या शेजारी झोपलेली पीडिता ही तिला दिसली नाही. ती कुठे गेली असेल म्हणून आईने घरच्या हॉलमध्ये जाऊन बघितले. जे चित्र तिला दिसले ते पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकली. आजोबा आणि नाती नको त्या अवस्थेत तिला दिसून आले. आईने तिच्या आजोबांना हटकले. आईने तिच्या वडिलांची अर्थात मुलीच्या आजोबांची विचारपूस केली. त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर आईने मुलीला विश्‍वासात घेतले.

आरोपीला पोलीस कोठडी

पीडितेने सांगितले की, तेरा एप्रिल 2021 रोजी घरी आजोबा आणि पीडिता याव्यतिरिक्त कुणीही नव्हते. या दिवशी आजोबांनी तिच्या एकटेपणाचा फायदा घेतला. तिच्यासोबत जबरी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. याबाबत कुणाला सांगितल्यास घरातून हाकलून लावीन, अशी धमकी दिली. त्यानंतर आजोबांनी अनेकदा तिच्यासोबत दृष्कृत्य केल्याचे पीडितेने सांगितले. घराची बदनामी नको, म्हणून तक्रार देण्यास टाळले. पण, त्यानंतरही आजोबांचे असले प्रकार सुरूच होते. त्यामुळं पीडितेच्या आईने कपिलनगर पोलिस ठाणे गाठले आणि तक्रार दिली. आरोपीला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

हे सुद्धा वाचा

'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.