Video : Nagpur Crime | धक्कादायक! नागपुरात 15 वैदू कुटुंबीयांना गावाबाहेर हाकलण्याचा डाव; वैदुच्या मुलांना शाळेत घेऊ नका, गावकऱ्यांचा दबाव

दोन दिवसांत जागा खाली करण्यासाठी नोटीस बजावण्यात आली. ही गंभीर बाब लक्षात घेत संघर्ष वाहिनीची टीम गावात गेली. दीनानाथ वाघमारे वैदू लोकांच्या वतीनं ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांशी चर्चा केली. तहसीलदारांचीही भेट घेतली. पण, वाघमारे यांचे समाधान झाले नाही. त्यामुळं त्यांनी ही व्यथा माध्यमांपुढं मांडली.

Video : Nagpur Crime | धक्कादायक! नागपुरात 15 वैदू कुटुंबीयांना गावाबाहेर हाकलण्याचा डाव; वैदुच्या मुलांना शाळेत घेऊ नका, गावकऱ्यांचा दबाव
नागपुरात 15 वैदू कुटुंबीयांना गावाबाहेर हाकलण्याचा डावImage Credit source: t v 9
Follow us
| Updated on: Jun 14, 2022 | 10:42 AM

नागपूर : जिल्ह्यात धक्कादायक घटना उघडकीस आली. 15 वैदू कुटुंबांना गावातून हाकलण्याचा डाव नरसाळा (Narsala) येथे उघडकीस आला. नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील नरसाळा येथील धक्कादायक ही घटना घडली. 15 वैदू समाजातील 75 जणांना गावातून हाकलण्यासाठी ग्रामपंचायतीनं (Gram Panchayat) पारीत ठरावं केला. दुसऱ्या जातीचे आणि राहणीमान नीट नसल्याने गावातून हाकलण्याचा डाव आखण्यात आला. संविधानिक मानवाधिकाराचं हनन होत असताना प्रशासन गप्प का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. 10 वर्षांपासून वैदू समाजाचे लोक या गावात राहतात. गावोगावी भटकंती करुन जळीबुटी विकणारा वैदू समाज आहे. वैदू समाजाला ना राशन कार्ड आहे ना मुलांना शाळेत शिक्षण घेता येतं. मौदा तालुक्यातील नरसाळ्यातील गटग्रामपंचायत असलेल्या कुंभापूर (Kumbhapur) गावात हा प्रकार घडला.

पाहा व्हिडीओ

भटक्या जमातीची शासन दरबारी नोंद नाही

या 15 कुटुंबातील 75 लोकं गेल्या दहा वर्षांपासून या गावाच राहतात. हे लोकं भटक्या जमातीचे आहेत. त्यांना हाकलण्याचा ठरावचं ग्रामपंचायत सदस्यांनी पारित केलाय. हे संविधानिक मानवाधिकाराचे उल्लंघन आहे. हे लोकं जंगलातून जडीबुटी आणतात. त्यांची औषधी तयार करून गावोगावी विकतात. युद्धात जखमी झालेल्यांवर इंग्रज काळात यांचे पूर्वज ही औषधी वापरत होते. या भटक्ता जमातीची शासन दरबारी नोंद नाही. सरकारच्या कोणत्याही सुविधा या भटक्या जमातीला मिळत नाहीत. विशेष म्हणजे यांची मुलंसुद्धा शिक्षणापासून वंचित आहेत. आता ग्रामपंचायतीनं तर येथील वैदू लोकांना हाकलण्याचा डाव आखला आहे. दोन दिवसांत जागा खाली करण्यासाठी नोटीस बजावण्यात आली. ही गंभीर बाब लक्षात घेत संघर्ष वाहिनीची टीम गावात गेली. दीनानाथ वाघमारे वैदू लोकांच्या वतीनं ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांशी चर्चा केली. तहसीलदारांचीही भेट घेतली. पण, वाघमारे यांचे समाधान झाले नाही. त्यामुळं त्यांनी ही व्यथा माध्यमांपुढं मांडली.

हे सुद्धा वाचा

25 मुलं शाळाबाह्य

तहसीलदारांनी सहा महिन्यांची मुदत या वैदू कुटुंबीयांना दिली आहे. त्यानंतर त्यांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. पण, त्यांच्या पुनर्वसनाची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न दीनानाथ वाघमारे यांनी उपस्थित केला आहे. या वैदू लोकांच्या कुटुंबात सुमारे 25 मुलं ही शाळाबाह्य आहेत. यासंदर्भात वाघमारे यांनी शिक्षणाधिकाऱ्यांशी चर्चा केली. प्रसेनजित गायकवाड यांनी स्थानिक शाळेतील मुख्याध्यापकांनी चर्चा केली. मुलांना शाळेत दाखल करण्यास सांगितलं. पण, गावकरी त्या मुलांना शाळेत टाकलात तर आम्ही आमची मुलं शाळेतून काढू असा दम देतात. त्यामुळं मुख्याध्यापक, अंगणवाडी सेविका यांनी वैदूंच्या मुलांची नोंदणी केली असली, तरी गावकऱ्यांच्या रोषापुढं काय होणार, असा सवाल निर्माण झालाय.

Non Stop LIVE Update
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.