Nagpur Crime : वीस रुपयांच्या उधारीवरुन वाद, चिकन विक्रेत्याने पाणीपुरी दुकानदाराला भोसकले !

नागपूरच्या जरीपटका पोलीस स्टेशन हद्दीत पाणीपुरीचा ठेला लावून पीडित विक्रेता आपला उदरनिर्वाह करतो. मात्र त्याच्याच बाजूला चिकनचे दुकान असलेल्या आरोपीने या ठेलेवाल्याकडून 20 रुपयाची उधारीवर पाणीपुरी खाल्ली.

Nagpur Crime : वीस रुपयांच्या उधारीवरुन वाद, चिकन विक्रेत्याने पाणीपुरी दुकानदाराला भोसकले !
दुचाकी चोरी करणाऱ्या बंटी बबलीला अटकImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jan 23, 2023 | 5:00 PM

नागपूर : केवळ 20 रुपये उधारीवरुन झालेल्या वादातून चिकन विक्रेत्याने पाणीपुरी दुकानदाराला चाकूने भोसकल्याची धक्कादायक घटना नागपुरमधील जरीपटका परिसरात घडली आहे. या हल्ल्या दुकानदार गंभीर जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दुकानदारावर हल्ला केल्यानंतर आरोपी पळून गेला. याप्रकरणी जरीपटका पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. शुल्लक कारणावरून घडलेल्या या घटनेमुळे परिसरात मात्र दहशतीचं वातावरण पसरलं आहे. या घटनेमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

आरोपी आणि पीडिताचे शेजारी शेजारी दुकान आहे

नागपूरच्या जरीपटका पोलीस स्टेशन हद्दीत पाणीपुरीचा ठेला लावून पीडित विक्रेता आपला उदरनिर्वाह करतो. मात्र त्याच्याच बाजूला चिकनचे दुकान असलेल्या आरोपीने या ठेलेवाल्याकडून 20 रुपयाची उधारीवर पाणीपुरी खाल्ली.

उधारीचे पैसे मागितले म्हणून पाणीपुरीवाल्याला भोसकले

पाणीपुरीवाल्याने जेव्हा दुसऱ्या दिवशी त्याच्याकडे उधारीचे पैसे मागितले, तेव्हा आरोपीला राग आला. आोरपीने रूक तेरे गुपचूप उधारी देता हू, तू मुझे उधारी मांगता है असं म्हणत धमकी दिली.

हे सुद्धा वाचा

यानंतर आपल्या चिकनच्या दुकानात जाऊन कोंबडी कापण्याचा चाकू घेऊन आला आणि त्याच्या पोटात भोसकला. यामध्ये पाणीपुरीवाला गंभीररित्या जखमी झाला. यानंतर आरोपीने त्या ठिकाणावरून पळ काढला. मात्र पोलिसांनी त्याला शोधून अटक केली.

केवळ 20 रुपयाच्या उधारीवरून या आरोपीने चक्क त्या पाणीपुरीवाल्याचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याच नशीब बलवत्तर म्हणून तो बचावला.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.