Nagpur Attack : नागपूरमध्ये दुचाकीला कट मारल्याच्या रागातून तरुणावर प्राणघातक हल्ला
पोलीस स्टेशनमध्ये दाखल तक्रारीनुसार फिर्यादी रवींद्र पराते हे बाबा ताजं चौकातून त्यांच्या दुचाकीने जात होते. यावेळी पराते यांच्या दुचाकीचा आरोपी इरफान पठाणच्या गाडीला कट लागला. कट लागल्याने इरफानने रवींद्र सोबत वाद घातला. वाद इतका टोकाला गेला की इरफानने जवळ असलेल्या धारदार शस्त्राने रविंद्रच्या हातावर, पोटावर आणि डोक्यावर वार केले.
नागपूर : दुचाकीला कट लागल्याच्या क्षुल्लक कारणा (Minor Dispute)वरून एका दुचाकी चालकावर प्राणघातक हल्ला (Attack) केल्याची घटना नागपूरच्या यशोधरा नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे. इरफान पठाण असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर रविंद्र पराते असे हल्ला झालेल्या दुचाकी (Two Wheeler) चालकाचे नाव आहे. याप्रकरणी यशोधरा नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला अटक केलं आहे. मात्र शुल्लक कारणांवरून अशा पद्धतीने जीवघेणे हल्ले भर वस्तीत होत असतील तर नक्कीच नागपुरात गुन्हेगारांवर कायद्याचा धाक आहे की नाही असा प्रश्न निर्माण होतो.
हल्ल्यात पराचे गंभीर जखमी
पोलीस स्टेशनमध्ये दाखल तक्रारीनुसार फिर्यादी रवींद्र पराते हे बाबा ताजं चौकातून त्यांच्या दुचाकीने जात होते. यावेळी पराते यांच्या दुचाकीचा आरोपी इरफान पठाणच्या गाडीला कट लागला. कट लागल्याने इरफानने रवींद्र सोबत वाद घातला. वाद इतका टोकाला गेला की इरफानने जवळ असलेल्या धारदार शस्त्राने रविंद्रच्या हातावर, पोटावर आणि डोक्यावर वार केले. पराते यांना गंभीर जखमी करून जिवे मारण्याचा प्रयत् इरफानने केला. रवींद्रला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी या प्रकरणात आरोपी इरफान पठाणवर गुन्हा दखल केला असून त्याला अटक देखील केली आहे.
बीडमध्ये संपत्तीच्या वादातून भावाकडून नायब तहसिलदारावर हल्ला
संपत्तीच्या वादातून सख्ख्या भावानेच महिला नायब तहसिलदारावर कार्यालयातच कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना बीडमध्ये घडली आहे. आशा वाघ असे हल्ला करण्यात आलेल्या नायब तहसीलदाराचे नाव आहे. या हल्ल्यात वाघ गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार सुरु आहेत. (In Nagpur a youth was attacked out of anger over a two-wheeler cut)