Nagpur Crime : भाड्याने घर बघण्याच्या बहाण्याने चोरी करणाऱ्या वृद्ध महिलेला पोलिसांनी घातल्या बेड्या

दुपारच्या वेळी एकतर महिलाच घरात असतात किंवा मग महिला आपल्या दाराची कडी लावून आजूबाजूला जातात, गप्पा मारत असतात. हीच संधी ही महिला साधते आणि उघडे असलेल्या घरात शिरून हात साफ कराते. मात्र जर तेवढ्यात कोणी महिला आलीच तर भाड्याची खोली आहे का खाली असे विचारण्याचे नाटक करते.

Nagpur Crime : भाड्याने घर बघण्याच्या बहाण्याने चोरी करणाऱ्या वृद्ध महिलेला पोलिसांनी घातल्या बेड्या
भाड्याने घर बघण्याच्या बहाण्याने चोरी करणाऱ्या वृद्ध महिलेला पोलिसांनी घातल्या बेड्याImage Credit source: TV 9
Follow us
| Updated on: Mar 29, 2022 | 10:38 PM

नागपूर : नागपूरमध्ये गुन्हेगारी थांबण्याचे नावच घेताना दिसत नाही. भाड्याने घर पाहायला आल्याचं दर्शवायचं आणि घरात कोणी नाही हे बघून त्या घरात चोरी (Theft) कणाऱ्या एका 59 वर्षीय महिला चोराला नागपूरच्या तहसिल पोलिसांनी अटक (Arrest) केली आहे. पोलिसांनी या महिलेच्या घरातून जवळपास 5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या घटनेमुळे सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. (In Nagpur police arrested an elderly woman for stealing under the pretext of renting a house)

अखेर पोलिसांनी या महिलेला बेड्या ठोकल्या

आतापर्यंत चोरी करणारे अनेक चोर पुरुष आणि महिला आपण बघितल्या असतील. मात्र नागपूरच्या तहसिल पोलिसांनी एका वृद्ध महिला चोराला अटक केली आहे. ही महिला दिवसभर परिसरात फिरते. विशेषतः दुपारच्या वेळी एकतर महिलाच घरात असतात किंवा मग महिला आपल्या दाराची कडी लावून आजूबाजूला जातात, गप्पा मारत असतात. हीच संधी ही महिला साधते आणि उघडे असलेल्या घरात शिरून हात साफ कराते. मात्र जर तेवढ्यात कोणी महिला आलीच तर भाड्याची खोली आहे का खाली असे विचारण्याचे नाटक करते. वृद्ध महिला दिसत असल्याने कोणी संशयही घेत नाही. मात्र पोलिसांच्या नजरेतून ही महिला वाचू शकली नाही. तिला अटक करून तिच्या घराची झडती घेतली असता तिच्या घरातून वेगवेगळ्या प्रकारचे दागिने असा 5 लाख रुपयांचा मुद्देमाल मिळून आला.

वर्ध्यात बनावट सोनं देऊन ऑटोचालकाची फसवणूक

बनावट सोनं देऊन 20 हजारांची रक्कम घेत ऑटोचालकाची फसवणूक केल्याची घटना दाभा परिसरात असलेल्या रेल्वे रुळानजीक घडली. याप्रकरणी हिंगणघाट पोलिसांनी दोन आरोपींना बेड्या ठोकल्या. धनराज भोसले आणि चारू फिरोज पठाण अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. प्रशांत मनोहर उमाटे असे लुटण्यात आलेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे. आरोपींनी आमच्याकडे सोनं आहे तुम्हाला पाहिजे असेल तर सांगा, असे म्हणत मोबाईल क्रमांक घेतला. त्यानुसार प्रशांत यांच्या मोबाईलवर धनराजचा फोन आला आणि सोनं पाहिजे असल्यास दाभा परिसरात असलेल्या रेल्वे रुळाजवळ या असे म्हणाला. त्यानुसार प्रशांत उमाटे हे तेथे गेले असता आरोपी धनराज भोसले आणि चारू फिरोज पठाण हे दोघे त्यांना भेटले. त्यांनी प्रशांतला खरं सोन आहे असे भासवून 20 हजारांची रक्कम घेऊन बनावट सोनं देत फसवणूक केली. (In Nagpur police arrested an elderly woman for stealing under the pretext of renting a house)

इतर बातम्या

नाशिकात दिवसभर नुसता जाळ आणि धूर, आगीच्या तब्बल तीन घटना

Wardha Suicide : प्रेम केलं, पण संघर्षाला मुकले; प्रेमी युगुलाची विहिरीत उडी घेत आत्महत्या

मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.