Nagpur Drug Action : नागपूरमध्ये 21 लाख रुपये एमडी ड्रग्जसह तस्कराला अटक, जरीपटका पोलिसांची कारवाई

जरीपटका पोलीस परिसरात गस्तीवर असताना एक संशयास्पद फिरणारा तरुण पोलिसांना पाहून पळू लागला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं असता तो एमडी तस्कर असल्याचं उघड झालं.

Nagpur Drug Action : नागपूरमध्ये 21 लाख रुपये एमडी ड्रग्जसह तस्कराला अटक, जरीपटका पोलिसांची कारवाई
बियर प्यायल्यानंतर कारमध्येच बेशुद्ध, डॉक्टरांकडून मृत घोषितImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Aug 26, 2022 | 5:19 PM

नागपूर : नागपुरात एका ड्रग तस्कर (Smuggler)ला 21 लाख रुपये किमतीच्या एमडी ड्रग (MD Drug)सह जरीपटका पोलिसांनी अटक (Arrest) केली आहे. पुढील तपास आता पोलीस करत आहे. शुभम निलमवार असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. शुभम मोठ्या टोळीसोबत संलग्न असल्याचा संशय पोलिसांना असून, नागपुरात देखील एमडी व्यवसाय आणि ग्राहकांचा शोध घेऊन त्याची पाळेमुळे नष्ट करण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. नागपुरात गेल्या काही दिवसात ड्रग तस्करीचं प्रमाण वाढत असल्याचे पोलिसांकडून होत असलेल्या कारवाईवरून दिसून येत आहे.

आरोपी आयटीआय झाला असून ड्रगचे व्यसन होते

जरीपटका पोलीस परिसरात गस्तीवर असताना एक संशयास्पद फिरणारा तरुण पोलिसांना पाहून पळू लागला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं असता तो एमडी तस्कर असल्याचं उघड झालं. पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे 21 लाख रुपयांचे 213 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. आरोपी शुभम निलमवार हा आयटीआय झाला असून, त्याला ड्रग्जचे व्यसन होते. यातून त्याची ओळख ड्रग तस्करांशी झाली. आपले व्यसन पूर्ण करता करता शुभम देखील या व्यवसायात उतरला. मुंबईवरून एमडी ड्रगची खेप आणून नागपुरात विक्री सुरू केली.

मुंबईत अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई

अंमली पदार्थ विरोधी पथकाने काल मुंबईत मोठी कारवाई करत 2 कोटी 80 लाख रुपयांचे एमडी ड्रग्स जप्त केले. याप्रकरणी दोन नायजेरियन आरोपींना अटक करत त्यांच्याकडून 1 किलोपेक्षा अधिक एमडी ड्रग्स जप्त करण्यात आले आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या वांद्रे युनिटने ही कारवाई केली आहे. (Jaripatka police arrested a smuggler with MD drugs worth Rs 21 lakh in Nagpur)

हे सुद्धा वाचा

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.