AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डॉक्टर दाम्पत्याच्या मुलांच्या अपहरणाचा कट, नागपुरात फॅशन डिझायनर महिलेला अटक

एक कोटी रुपये न दिल्यास मुलांचे अपहरण करुन जीवे मारण्याची धमकी आरोपी महिलेने दिली होती.

डॉक्टर दाम्पत्याच्या मुलांच्या अपहरणाचा कट, नागपुरात फॅशन डिझायनर महिलेला अटक
मध्य प्रदेशात पत्नीने खायला सांगितले म्हणून पतीने तिचे नाक कापले
| Edited By: | Updated on: Jun 17, 2021 | 8:05 AM
Share

नागपूर : नागपूरमध्ये डॉक्टर दाम्पत्याकडे एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी फॅशन डिझायनर महिलेला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. वेब सीरिज पाहून तरुणीने डॉक्टर दाम्पत्याच्या मुलांच्या अपहरणाचा कट रचल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. (Lady Fashion Designer arrested for Extortion of 1 crore from Nagpur Doctor Couple)

एक कोटी रुपये न दिल्यास मुलांचे अपहरण करुन जीवे मारण्याची धमकी आरोपी महिलेने दिली होती. फॅशन डिझायनर शीतल इटनकर या महिलेला बुधवारी पोलिसांनी अटक केली. नागपूरमधील बेलतरोडी पोलसांनी ही कारवाई केली.

एक कोटी रुपयांची खंडणी

शीतलने कुरिअरच्या माध्यमातून डॉक्टर दाम्पत्याला पत्र पाठवत एक कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. त्यानंतर सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय अकोट यांच्या नेतृत्वात बेलतरोडी पोलिसांनी तिच्यावर कारवाई केली. शीतलला 19 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

नेमकं काय घडलं?

डॉ. पांडे दाम्पत्याचे नागपुरात मॅटर्निटी होम आहे. 11 जूनला संध्याकाळी त्यांना कुरिअरने एक पत्र आलं. एक कोटी रुपयांची खंडणी न दिल्यास आणि पोलिसांना कळवल्यास मुलांचं अपहरण करुन त्यांना जीवे मारण्याची धमकी अज्ञात अपहरणकर्त्यांनी दिली होती. 17 जूनला मनिष नगर भागातील कचरा कुंडीजवळ बॅगेत पैसे ठेवण्यास सांगण्यात आलं होतं. डॉक्टरांनी न घाबरता पोलिसांना याविषयी माहिती दिली.

पोलिसांनी कसा शोध लावला?

पोलिसांनी कुरिअर ऑफिसच्या परिसरातील सीसीटीव्ही फूटेज तपासले. यावेळी, मध्यमवयीन महिला दुचाकीने कुरिअर देण्यासाठी आल्याचं त्यांना समजलं. दुचाकीच्या रजिस्ट्रेशन नंबरवरुन पोलिसांनी महिलेचं लोकेशन शोधून काढलं. त्यानंतर तिला बेड्या ठोकून तिची दुचाकीही जप्त केली.

वेब सीरीज पाहून अपहरणाची योजना

आरोपी शीतल इटनकर ही डॉ. पांडे यांची पेशंट असल्याचं समोर आलं. शीतल आणि तिच्या पतीवर डॉक्टरांनी कोरोना काळात उपचारही केले होते. शीतल इटनकरला दोन मुली आहेत. फॅशन बुटीक सुरु करण्यासाठी पैसे हवे असल्यामुळे तिने खंडणी मागितल्याची माहिती आहे. वेब सीरीज पाहून तिने अपहरणाची योजना आखली होती, असं तपासात पुढे आलं.

संबंधित बातम्या :

एक्सप्रेस आंबिवली रेल्वे स्टेशनवर थांबली, अभिनेत्री फोनवर बोलत दरवाज्यावर आली, चोरट्याने संधी साधली

जेव्हा कुंपणच शेत खातं, नवी गाडी घेतली, ड्रायव्हरकडे एक चावी, त्याने थेट पळवून नेली

(Lady Fashion Designer arrested for Extortion of 1 crore from Nagpur Doctor Couple)

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.