Nagpur police : बारमध्ये दारू ढोसली, उलट हप्ता मागितला, नागपूर पोलिसांत गुन्हा दाखल
बारमध्ये दारू पिल्यानंतर माझ्याकडून दारूचे बिल घ्यायचं नाही. मला दोन हजार रुपये हप्ता द्यायचे अशा प्रकारची धमकी देण्यात आली. धमकी देणाऱ्याविरोधात जरीपटका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय.
नागपूर : नागपूरच्या जरीपटका पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या एका बारमध्ये तीन-चार जण दारू प्यायला गेले. दारू प्यायल्यानंतर तू जास्तीचे शुल्क लावले. असं म्हणत त्यांनी बारच्या मॅनेजरसोबत (Manager) वाद घातला. यानंतर मी जेव्हा जेव्हा दारू प्यायला येईन तेव्हा दारूचं बिल घ्यायचं नाही. उलट मला दोन हजार रुपये हप्ता द्यायचा. अशा प्रकारची धमकी देऊन मॅनेजरसोबत हुज्जत घातली. या प्रकरणी आरोपी विरोधात जरीपटका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. बारमध्ये घडलेला सगळा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. तो पोलिसांनासुद्धा देण्यात आला. त्यावरून पोलीस आरोपीच्या शोध घेत आहेत. अशी माहिती जरीपटका (Jaripatka) पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक (Sub-Inspector of Police) प्रदीप टेकनी यांनी दिली.
यापूर्वीच्या तक्रारीचा खर्च देण्यासाठी दबाव
बारमध्ये प्यायल्यानंतर माझ्याकडून दारूचे बिल घ्यायचं नाही. मला दोन हजार रुपये हप्ता द्यायचे अशा प्रकारची धमकी देण्यात आली. धमकी देणाऱ्याविरोधात जरीपटका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. धमकी देण्याचा सगळा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. पोलीस आता आरोपीचा शोध घेत आहेत. आरोपीने याआधी सुद्धा या बारमध्ये जाऊन गोंधळ घातला होता. त्याच्या विरोधात तक्रार दिल्यानंतर त्याला कोर्टात जावं लागलं. त्यासाठी त्याचे पैसे खर्च झाले. ते पैसे हप्त्याच्या रूपाने मला दे. माझ्याकडून दारू पिण्याचे पैसे मागायचे नाही. अशी धमकी दिल्याने त्याला पुन्हा एकदा जेलमध्ये जावं लागणार आहे.जरीपटका पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. आरोपी जुनेच असल्यानं त्यांचा शोध घेणे पोलिसांना सोपे जाणार आहे. शिवाय सीसीटीव्ही फुटेजवरून आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल करता येईल.