स्पीड ब्रेकरजवळ बाईकला ट्रकची धडक, आठ महिन्यांचं बाळ जागीच मृत्युमुखी, आई-वडील गंभीर

स्पीड ब्रेकरवर दुचाकीचा वेग कमी केल्याने मागून भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील आठ महिन्यांचे बाळ जागीच मृत्युमुखी पडले. तर बाळाचे आई-वडील गंभीर जखमी झाले आहेत

स्पीड ब्रेकरजवळ बाईकला ट्रकची धडक, आठ महिन्यांचं बाळ जागीच मृत्युमुखी, आई-वडील गंभीर
बुलडाण्यात बाईक अपघातImage Credit source: टीव्ही9
Follow us
| Updated on: Mar 07, 2022 | 8:37 AM

बुलडाणा : बाईकला मागून ट्रकची धडक बसल्याने भीषण अपघात (Bike Accident) झाल्याची घटना समोर आली आहे. अपघातामध्ये दुचाकीवरील 8 महिन्यांचे बाळ (Child Death) जागीच मृत्युमुखी पडले, तर बाळाचे आई-वडील गंभीर जखमी झाले आहेत. बुलडाणा जिल्ह्यात (Buldana) खामगावमधील घाटपुरी जवळ ही दुर्दैवी घटना धडली. रुग्णालयात दाखल असलेल्या नातेवाईकाला भेटून परत येत असताना हा अपघात घडला. स्पीड ब्रेकरजवळ बाईकचा वेग कमी झाला असताना ट्रकने त्यांना मागून उडवलं. या प्रकरणी पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतलं आहे. अपघातानंतर काही काळ मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. मात्र ट्राफिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कोंडी सोडवली.

बाळाचा मृत्यू, आई-वडील जखमी

स्पीड ब्रेकरवर दुचाकीचा वेग कमी केल्याने मागून भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील आठ महिन्यांचे बाळ जागीच मृत्युमुखी पडले. तर बाळाचे आई-वडील गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव शहराजवळ असलेल्या घाटपुरी देवीजवळ रविवारी सायंकाळी घडली. या घटनेमुळे रस्त्यावर काही काळ ट्राफिक जाम झाला होता, मात्र पोलिसांनी घटनास्थळ गाठून तात्काळ वाहतूक कोंडी दूर केली.

नेमकं काय घडलं?

जळगाव जामोद तालुक्यातील खांडवी येथील आनंद चांडक हे आपली पत्नी दुर्गा चांडक आणि 8 महिन्याचे बाळ हंस चांडक यांच्यासोबत खामगाव येथील रुग्णालयात दाखल असलेल्या नातेवाईकाला भेटण्यासाठी आले होते.

स्पीड ब्रेकरजवळ ट्रकची धडक

सायंकाळी ते घरी परतत असताना खामगाव शहराजवळ घाटपुरी देवी जवळील स्पीड ब्रेकरवर चांडक यांनी आपल्या दुचाकीचा वेग कमी केला असता मागून भरधाव येणाऱ्या ट्रकने दुचाकीला जबर धडक दिली.

या अपघातात हंस चांडक हे आठ महिन्यांचे बाळ जागीच ठार झालं, तर आई वडील हे गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले आहे.

संबंधित बातम्या :

नातेवाईकांच्या साखरपुड्याला जाताना बाईक अपघात, पित्यासह लहान मुलाचाही मृत्यू

तोंडी परीक्षेहून येताना काळाचा घाला, बाईक अपघातात दहावीच्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

आधी वडील गेले, आता लग्नाच्या तोंडावर लेकाचाही मृत्यू, बाईक अपघातात बालमित्रांचा करुण अंत

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.