Bike Accident | 20 फूट खाली कोसळल्यामुळे भंडाऱ्यात बाईकस्वाराचा मृ्त्यू, अपघात दुपारी, रात्री उघड

राधेलाल उरकूट पटले असं मयत तरुणाचं नाव आहे. राधेलाल दुचाकीने रामटेककडून तुमसरच्या दिशेने येत असताना भंडारा जिल्ह्यात रामटेक-तुमसर राष्ट्रीय महामार्गावर नागठाणा येथे हा अपघात झाला.

Bike Accident | 20 फूट खाली कोसळल्यामुळे भंडाऱ्यात बाईकस्वाराचा मृ्त्यू, अपघात दुपारी, रात्री उघड
बाईक अपघातात तरुणाचा मृत्यूImage Credit source: टीव्ही 9
Follow us
| Updated on: May 12, 2022 | 8:19 AM

भंडारा : अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. बाईक रस्त्यापासून (Bike Accident) 20 फूट खाली कोसळल्यामुळे तरुणाला प्राण गमवावे लागले. भंडारा जिल्ह्यात (Bhandara Accident) रामटेक-तुमसर राष्ट्रीय महामार्गावर नागठाणा येथे हा अपघात झाला. धक्कादायक म्हणजे दुपारीच हा अपघात झाला होता, मात्र रात्री उशिरा एका शेतकऱ्याने बाईक पाहिल्यानंतर अपघाताचा उलगडा झाला. कदाचित वेळीच या अपघाताची माहिती इतर वाटसरु किंवा वाहन चालकांना मिळाली असती, तर बाईकस्वाराचे प्राण वाचू शकले असते, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.

नेमकं काय घडलं?

राधेलाल उरकूट पटले, खरकपूर (वय 35 वर्ष, रा. ता. कटंगी, जि. बालाघाट) असं मयत तरुणाचं नाव आहे. राधेलाल दुचाकीने रामटेककडून तुमसरच्या दिशेने येत असताना भंडारा जिल्ह्यात रामटेक-तुमसर राष्ट्रीय महामार्गावर नागठाणा येथे हा अपघात झाला.

रस्त्याच्या 20 फूट खाली कोसळला

दुचाकीवरुन चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे तो रस्त्याच्या 20 फूट खाली कोसळला. त्यामुळे तो मृत्युमुखी पडला. ही घटना काल (बुधवारी) दुपारच्या सुमारास घडली.

हे सुद्धा वाचा

मृतदेह दुपारपासून घटनास्थळी पडून

राधेलाल नागपूरवरून सकाळी आपल्या खरकपूर गावाकडे जात असताना नागठाणा जवळ हा अपघात घडला. त्याचा मृतदेह दुपारपासून घटनास्थळी पडला होता. मात्र एका शेतकऱ्याला रात्रीच्या वेळी बाईक दिसल्याने ही घटना उघडकीस आली.

या घटनेची माहिती आंधळगाव पोलीस ठाण्याला मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.