अमरावतीच्या 31 वर्षीय नर्सशी ऑनलाईन ओळख, लग्नाच्या आमिषाने अत्याचार, पाच महिन्यांनी बिंग फुटलं

लग्नाचे आमिष दाखवून आरोपीने तरुणीवर तब्बल पाच महिन्यांपासून लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तरुणाने लग्न करण्यास वेळोवेळी टाळले, अंतिमतः लग्नाला नकार दिल्याने या प्रकरणी तरुणीने पोलिसात धाव घेतली.

अमरावतीच्या 31 वर्षीय नर्सशी ऑनलाईन ओळख, लग्नाच्या आमिषाने अत्याचार, पाच महिन्यांनी बिंग फुटलं
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Feb 11, 2022 | 7:05 AM

मुक्ताईनगर : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर वारंवार लैंगिक अत्याचार (Rape on Pretext of Marriage) करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. 31 वर्षीय पीडित तरुणी एका खाजगी रुग्णालयात नर्स (Nurse) म्हणून कार्यरत असल्याची माहिती आहे. ती अमरावती (Amravati) जिल्ह्यातील रहिवासी आहे. एका अॅपच्या माध्यमातून पीडितेची ओळख आरोपी तरुणाशी झाली होती. महिलेला लग्नाचे आमिष दाखवत तरुणीवर तब्बल पाच महिने अत्याचार करण्यात आल्याचा आरोप आहे. तरुणाने लग्नाचा विषय वेळोवेळी टाळून अखेर नकार दिल्याने तिने पोलिसात धाव घेतली. भूषण संजयराव तायडे असे आरोपीचे नाव आहे. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात शून्य क्रमांकाने हा गुन्हा वर्ग झाला आहे.

काय आहे प्रकरण?

लग्नाचे आमिष दाखवून आरोपीने तरुणीवर तब्बल पाच महिन्यांपासून लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तरुणाने लग्न करण्यास वेळोवेळी टाळले, अंतिमतः लग्नाला नकार दिल्याने या प्रकरणी तरुणीने पोलिसात धाव घेतली.

पीडितेने अमरावती शहरातील फैजरपूर शहर पोलिस स्टेशनमध्ये संशयित आरोपी भूषण संजयराव तायडे याच्या विरोधात तक्रार दिली होती. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. हा गुन्हा जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात शून्य क्रमांकाने वर्ग झाला आहे. याचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक राहुल बोरकर करत आहे.

नेमकं काय घडलं?

31 वर्षीय तरुणी एका खाजगी रुग्णालयात नर्स म्हणून नोकरीला आहे. ‘हॅलो यू ॲपच्या माध्यमातून तरुणीची ओळख मुक्ताईनगर येथील रहिवासी असलेल्या भूषण संजयराव तायडे (वय 31 वर्ष) याच्याशी झाली होती. त्यानंतर दोघांमध्ये मैत्री झाली, आणि नंतर मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. मात्र याचा गैरफायदा घेत आरोपीने अत्याचार केल्याची तक्रार पोलिसात देण्यात आली आहे. अमरावती पोलीस स्टेशनमधून हा गुन्हा मुक्ताईनगर पोलिसात वर्ग करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या :

दोन्ही कुटुंबांच्या संमतीने विवाह ठरला, नवरदेवाला चैन पडेना, लग्नाआधीच तरुणीवर बलात्कार

लग्न ठरल्यानंतर अश्लील मेसेज पाठवणे हा भावी जोडीदाराच्या विनयशीलतेचा अपमान नाही : कोर्ट

मुंबईचा तरुण, भंडाऱ्याची तरुणी, लग्नाच्या आमिषाने नागपुरात बलात्कार

'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.