AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमरावतीत तरुणीच्या गुप्तांगातून स्वॅब घेतल्याचे प्रकरण, टेक्निशियनला दहा वर्षांचा सश्रम कारावास

अमरावतीच्या बडनेरा येथील मोदी ट्रॉमा केअर सेंटरमध्ये कोरोना चाचणी करण्यासाठी गेलेल्या तरुणीच्या घशातील स्वॅब घेतल्यानंतर टेक्निशियन असलेला 30 वर्षीय आरोपी अलकेश देशमुख याने तिच्या गुप्तांगामधील स्वॅब घेतल्याचा प्रकार जवळपास दीड वर्षांपूर्वी समोर आला होता.

अमरावतीत तरुणीच्या गुप्तांगातून स्वॅब घेतल्याचे प्रकरण, टेक्निशियनला दहा वर्षांचा सश्रम कारावास
तरुणीच्या गुप्तांगातील स्वॅब नमुने घेतल्याचे प्रकरण
| Edited By: | Updated on: Feb 03, 2022 | 7:40 AM
Share

अमरावती : कोरोना चाचणी करण्यासाठी गेलेल्या तरुणीच्या गुप्तांगातील स्वॅब (Swab Test) घेतल्याचा संतापजनक प्रकार दीड वर्षांपूर्वी उघडकीस आला होता. अमरावतीच्या (Amravati) बडनेरा येथील मोदी ट्रॉमा केअर सेंटरमध्ये जुलै 2020 मध्ये ही घटना घडली होती .या प्रकरणातील आरोपीला दहा वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अमरावती जिल्हा सत्र न्यायालयाने या प्रकरणी महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. या प्रकारानंतर सर्वच स्तरातून संतापाची लाट उमटली होती. पीडित तरुणीच्या तक्रारीवरुन आरोपी अलकेश देशमुख याच्या विरुद्ध बडनेरा पोलिसांनी विनयभंगाचा (Molestation) गुन्हा दाखल करत त्याला अटक केली होती. तरुणीच्या घशातील स्वॅब घेतल्यानंतर टेक्निशियन अलकेशने तिच्या गुप्तांगातूनही स्वॅबचे नमुने घेतल्याचा आरोप झाला होता. त्याच्याविरोधातील आरोप सिद्ध झाल्यानंतर कोर्टाने त्याला दहा वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.

काय आहे प्रकरण?

अमरावतीच्या बडनेरा येथील मोदी ट्रॉमा केअर सेंटरमध्ये कोरोना चाचणी करण्यासाठी गेलेल्या तरुणीच्या घशातील स्वॅब घेतल्यानंतर टेक्निशियन असलेला 30 वर्षीय आरोपी अलकेश देशमुख याने तिच्या गुप्तांगामधील स्वॅब घेतल्याचा प्रकार जवळपास दीड वर्षांपूर्वी समोर आला होता. तरुणीच्या तक्रारीवरुन आरोपी अलकेश विरुद्ध बडनेरा पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता.

नेमकं काय घडलं?

पीडित 24 वर्षीय तरुणी अमरावती येथे भावाकडे राहत होती. ती नोकरी करत असलेल्या ठिकाणी तिचा सहकारी कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. त्यामुळे 28 जुलै 2020 रोजी ती कोव्हिड चाचणीसाठी लॅबमध्ये गेली होती. तिच्याबरोबरच इतर 20 जणांचीही चाचणी घेण्यात आली.

युरिनल तपासणीची सबब

स्वॅब घेणाऱ्या आरोपीने तरुणीला परत बोलावले आणि तुमची चाचणी पॉझिटिव्ह आल्याचे सांगितले. तुम्हाला युरिनल तपासणी करावी लागेल असे आरोपीने सांगताच तरुणीने तिच्या महिला सहकाऱ्याला कळवले. त्या दोघींनी महिला कर्मचारी नाहीत का, असेही विचारले. परंतु आरोपीने नकारार्थी मान दर्शवत सोबत महिला सहकाऱ्याला थांबू देण्याची परवानगी दिली. त्यानंतर तिच्या गुप्तांगातील स्वॅब तपासणी केली. त्यानंतर टेक्निशियनने तुमची टेस्ट निगेटिव्ह आल्याचे सांगितले.

योनीद्वारे घेतलेल्या स्वॅब तपासणीबाबत शंका आल्याने तरुणीने आपल्या भावाला याबाबत विचारलं. त्याने डॉक्टरांना विचारलं असता अशा प्रकारे चाचणी करत नसल्याचं त्यांनी सांगितलं. त्यानंतर तिने पोलिसात तक्रार दाखल केली.

अलकेश देशमुखच्या विरोधात राज्यभरातून चीड व्यक्त केली जात होती. बडनेरा पोलिसांनी विविध कलमांसह अॅट्रोसिटी, आयटी कायद्याच्या कलमान्वये गुन्हे दाखल केले. त्यानंतर अलकेशला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. आता या प्रकरणी अमरावती जिल्हा सत्र न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला असून आरोपी अलकेश देशमुख याला दहा वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

संबंधित बातमी :

24 वर्षीय तरुणीच्या गुप्तांगातील स्वॅब नमुने, संतापजनक प्रकारानंतर लॅब टेक्निशिअनला बेड्या

तरुणीच्या गुप्तांगातील स्वॅब नमुने प्रकरण; अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांचा संताप

मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.