AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दोन अल्पवयीन मुलांचे अश्लील कृत्य शूट, व्हिडीओ व्हायरल, अमरावतीत तिघांना बेड्या

अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथे राहणाऱ्या तीन युवकांनी ओळखीच्या अल्पवयीन मुलांचा अश्लील व्हिडीओ तयार केल्याचा धक्कादायक आणि किळसवाणा प्रकार समोर आला आहे. नऊ आणि अकरा वर्ष वय असलेली हो दोन बालकं आहेत.

दोन अल्पवयीन मुलांचे अश्लील कृत्य शूट, व्हिडीओ व्हायरल, अमरावतीत तिघांना बेड्या
crimeImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Feb 14, 2022 | 8:17 AM
Share

अमरावती : दोन अल्पवयीन मुलांना (Minor Boys) अश्लील कृत्य करायला लावून त्यांचा व्हिडीओ शूट (Obscene Video Shoot) केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. इतक्यावरच न थांबता आरोपींना दोघांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याचाही आरोप आहे. ही बाब मुलांच्या पालकांना समजताच त्यांनी पोलिसात धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी तिघा जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तिन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. अमरावती (Amravati Crime) जिल्ह्यातील तिवसा तालुक्यात हा घृणास्पद प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. आपण नवीन प्रकारचा व्हिडीओ तयार करु, असे सांगून दोघा बालकांना अश्लील कृत्य करण्यास सांगितल्याचा दावा केला जात आहे. या किळसवाण्या घटनेमुळे दोन्ही बालकांच्या मनात भीती दाटून आल्याची माहिती आहे.

काय आहे प्रकरण?

अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथे राहणाऱ्या तीन युवकांनी ओळखीच्या अल्पवयीन मुलांचा अश्लील व्हिडीओ तयार केल्याचा धक्कादायक आणि किळसवाणा प्रकार समोर आला आहे. नऊ आणि अकरा वर्ष वय असलेली हो दोन बालकं आहेत. अश्लील व्हिडिओ बनवणारे हे तीन महाभाग इतक्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरलही केला.

हा धक्कादायक प्रकार पीडित बालकांच्या पालकांना माहित होताच त्यांनी तिवसा पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हे दाखल करुन तिघांनाही अटक केली आहे.

नेमकं काय घडलं?

तिवसा येथील रहिवासी असलेल्या तिघा युवकांनी परिचित असलेल्या दोन बालकांना आठ दिवसांपूर्वी दुपारी दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास गावातील एका ठिकाणी नेले. आपण नवीन प्रकारचा व्हिडीओ तयार करु, असे या तिघांनी दोन बालकांना सांगितले. त्या बालकांना अश्लील कृत्य करण्यास सांगितले.

त्यानंतर या तिघांनी दोन बालकांचा एकत्रितपणे अश्लील व्हिडीओ तयार केला. त्यानंतर पीडित मुलांच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीवरुन तिघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सुरु आहे.

बालविकास मंत्र्यांचा मतदारसंघ

तिवसा हा काँग्रेस नेत्या आणि अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांचाच विधानसभा मतदारसंघ आहे. महिला आणि बालविकास मंत्रालयाची धुरा सांभाळणाऱ्या नेत्याच्या मतदारसंघातच ही घटना उघडकीस आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

संबंधित बातम्या :

अश्लील व्हिडीओ शूट करुन प्रियकराकडूनच ब्लॅकमेल, अल्पवयीन मुलीवर सहा महिने तिघांचा गँगरेप

आठ वर्षांच्या बालिकेवर बलात्कार, निर्लज्ज आरोपी अटकेवेळीही पॉर्न पाहत बसलेला

महिला डॉक्टरचा मित्रासोबत अश्लील व्हिडीओ, कम्पाऊण्डरच्या प्रियकराकडून ब्लॅकमेल, मुंबईत दोघांना अटक

मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.