Suicide | प्रेयसीच्या आईने खडसावलं, बदनामीच्या भीतीने 21 वर्षीय प्रियकराची आत्महत्या

मुलीच्या आईने कृष्णासोबत वाद घातला. आता आपली बदनामी गावभर होणार असल्याची भीती बाळगून कृष्णाने स्वतःच्या शेतात जाऊन झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली आहे.

Suicide | प्रेयसीच्या आईने खडसावलं, बदनामीच्या भीतीने 21 वर्षीय प्रियकराची आत्महत्या
भंडाऱ्यात तरुणाची आत्महत्याImage Credit source: टीव्ही9
Follow us
| Updated on: Apr 11, 2022 | 9:01 AM

भंडारा : 21 वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. भंडारा जिल्ह्याच्या लाखणी तालुक्यातील सोमलवाडा येथे (Bhandara Crime) हा प्रकार घडला. स्वतःच्या शेतात रश्शीच्या सहाय्याने झाडाला गळफास घेत तरुणाने आपलं आयुष्य संपवलं. कृष्णा शालिक अतकरी (रा. सोमलवाडा) असं मयत तरुणाचं नाव आहे. प्रेमसंबंधातून तरुणाने (Love Affair) आत्महत्या केल्याचा आरोप केला जात आहे. अल्पवयीन प्रेयसीच्या आईने खडसावल्यानंतर बदनामीच्या भीती तरुणीने जीवनयात्रा संपवल्याची माहिती आहे.

काय आहे प्रकरण?

मृतक कृष्णा अतकरीचे त्याच्या गावातील अल्पवयीन मुलीबरोबर प्रेम संबंध जुळले होते. याची माहिती मुलीच्या आईला समजली. त्यानंतर मुलीच्या आईने कृष्णासोबत वाद घातला. आता आपली बदनामी गावभर होणार असल्याची भीती बाळगून कृष्णाने स्वतःच्या शेतात जाऊन झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली आहे.

यापूर्वीही दोन वेळा आत्महत्येचा प्रयत्न

याआधी सुद्धा त्याने दोन वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. शनिवारी भांडण झाल्यानंतर कृष्णा रात्रभर घरी परत न आल्याने घरच्या लोकांनी शोधाशोध केली, मात्र कृष्णा दिसला नाही.

एका व्यक्तीला झाडाला मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्याने याची माहिती लाखनी पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवला आहे. या घटनेमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

संबंधित बातम्या :

Suicide | प्रियकराचा लग्नाला नकार, प्रेयसीसह सहा मैत्रिणींनी विष प्यायलं, तिघींचा मृत्यू

पोटच्या मुलीसह 24 वर्षीय महिलेची आत्महत्या, औरंगाबादमध्ये खळबळ

चारित्र्यावर संशय घेणाऱ्या पतीची हत्या, आत्महत्येचा बनाव, पोलिसांनी पितळ उघडं पाडलं

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.