Bhandara | अथक परिश्रमांनी पक्क्या घराचं स्वप्न साकार, त्याच घरात पायरीवरुन पडल्याने तरुणाचा मृत्यू

घरात सहजपणे चालताना शरदचा पाय पायरीवरुन घसरला. डोक्याच्या भारावर एकाकी पडल्याने त्याच्या मेंदूला जबर जखम झाली होती. त्याला उपचारासाठी नागपूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते

Bhandara | अथक परिश्रमांनी पक्क्या घराचं स्वप्न साकार, त्याच घरात पायरीवरुन पडल्याने तरुणाचा मृत्यू
भंडाऱ्यात तरुणाचा पायरीवरुन पडून मृत्यूImage Credit source: टीव्ही9
Follow us
| Updated on: Apr 11, 2022 | 12:43 PM

भंडारा : घरातच पायरीवरुन (Staircase) पाय घसरुन पडल्यानंतर गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू झाला. डोक्याला जबर मार लागलेल्या युवकाची उपचार सुरु असताना प्राणज्योत मालवली. भंडारा जिल्ह्याच्या (Bhandara) लाखनी तालुक्यातील जेवणाळा (कवडसी) येथे ही हृदयद्रावक घटना घडली आहे. शरद यादवराव बुरडे असं मयत तरुणाचं नाव आहे. वयाच्या अवघ्या 38 व्या वर्षी शरदचा दुर्दैवी मृत्यू झाला. शरद बुरडे हा शेतकरी होता. अथक प्रयत्नांनंतर त्याने पक्के घर बांधले, मात्र हे पक्के घरच त्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरले, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.

नेमकं काय घडलं?

घरात सहजपणे चालताना शरदचा पाय पायरीवरुन घसरला. डोक्याच्या भारावर एकाकी पडल्याने त्याच्या मेंदूला जबर जखम झाली होती. त्याला उपचारासाठी नागपूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र दुपारच्या सुमारास उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे.

कुटुंबावर शोककळा

शवविच्छेदनानंतर जेवणाळा येथे शरदवर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली, भाऊ असा मोठा आप्त परिवार आहे. शरदच्या अकाली निधनाने बुरडे कुटुंबावर शोककळा पसरली आहे. जेवणाळा (कवडसी) गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

संबंधित बातम्या :

धक्कादायक! परळ डेपोजवळ बेशुद्धावस्थेत आढळले, मुंबईत एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू

मोहफुल वेचायला गेले अन् घामाघाम झाले, कालव्यात उतरले तर काका-पुतण्याला मृत्यूने गाठले

बाळंतपणात पोट फुगून इन्फेक्शन, नर्सच्या मृत्यूने बाळ पोरकं, नातेवाईकांचा डॉक्टरवर संताप

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.