माय लास्ट लोकेशन इज…, व्हॉट्सअ‍ॅपवर स्टेटस, पुलावर सायकल, भंडाऱ्यात ITI च्या विद्यार्थ्याचं टोकाचं पाऊल?

भंडारा जिल्ह्यात तुमसर येथील एका आयटीआय प्रशिक्षण संस्थेत शिकत असलेल्या विद्यार्थ्याच्या सोशल मीडिया स्टेटसमुळे खळबळ उडाली आहे. आयटीआय परीक्षेत नापास झाल्यामुळे आलेल्या नैराश्यातून त्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा अंदाज आहे.

माय लास्ट लोकेशन इज..., व्हॉट्सअ‍ॅपवर स्टेटस, पुलावर सायकल, भंडाऱ्यात ITI च्या विद्यार्थ्याचं टोकाचं पाऊल?
भंडाऱ्यात विद्यार्थ्याची आत्महत्या
Follow us
| Updated on: Feb 22, 2022 | 7:10 AM

भंडारा : ‘माय लास्ट लोकेशन इज माडगी ब्रीज’ असं व्हॉट्सअ‍ॅपवर स्टेटस (WhatsApp Status) ठेवल्यामुळे विद्यार्थ्याने टोकाचं पाऊल उचलल्याची भीती व्यक्त केली जात आहे. आयटीआयच्या विद्यार्थ्याने आत्महत्या (ITI Student Suicide) केल्याची भीती व्यक्त केली जात आहे. भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथे (Tumsar Bhandara) हा धक्कादायक प्रकार घडल्याची माहिती आहे. परीक्षेच्या निकालात नापास झाल्यामुळे विद्यार्थ्याला नैराश्य आल्याचं बोललं जात आहे. पोलिसांना याची माहिती मिळताच विद्यार्थ्याची शोध मोहीम हाती घेण्यात आली. विद्यार्थ्याने उल्लेख केलेल्या माडगी पुलावर सायकल आणि जॅकेट आढळले आहे, मात्र 48 तास गेल्यानंतरही विद्यार्थ्याचा शोध लागलेला नाही. त्यामुळे संबंधित विद्यार्थ्याने आत्महत्या केला, की आत्महत्येचा बनाव केला आहे, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र लेकाच्या काळजीने त्याच्या कुटुंबीयांना हुरहूर लागून राहिली आहे.

काय आहे प्रकरण?

भंडारा जिल्ह्यात तुमसर येथील एका आयटीआय प्रशिक्षण संस्थेत शिकत असलेल्या विद्यार्थ्याच्या सोशल मीडिया स्टेटसमुळे खळबळ उडाली आहे. आयटीआय परीक्षेत नापास झाल्यामुळे आलेल्या नैराश्यातून त्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा अंदाज आहे. माडगी येथील वैनगंगा नदीच्या पुलावरुन नदी पात्रातील पाण्यात उडी घेत त्याने आत्महत्या केल्याची भीती व्यक्त केली जात आहे. “माय लास्ट लोकेशन इज माडगी ब्रीज’ असं स्टेस्टस त्याने ठेवलं होतं. 20 वर्षीय विद्यार्थी शहरातील तुमसर वॉर्डमध्ये राहतो.

वैनगंगा नदीच्या पुलावरुन नदीपात्रात उडी?

तुमसर येथील एका आयटीआय. प्रशिक्षण संस्थेत शिकत असलेला संबंधित विद्यार्थी परीक्षेत नापास झाल्यामुळे घरी चिंतेत वावरत होता. त्यानंतर त्याने काल (सोमवारी) माडगी वैनगंगा नदीच्या पुलावरुन नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केली असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याच्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसनुसार नदीपात्रात त्याचा शोध घेण्याचे प्रयत्न पोलिसांकडून सुरु होते, परंतु 48 तास उलटून गेल्यानंतरही त्याचा शोध लागलेला नाही. सोमवारी रात्री उशिरापर्यंत पोलिसांचे शोधकार्य सुरु होते. मात्र त्याचा काहीच थांगपत्ता लागत नसल्याने विद्यार्थ्याने आत्महत्या केली, की आत्महत्येचा बनाव केला, असा सवाल उपस्थित होत आहे.

संबंधित बातम्या :

कॉन्स्टेबल नवऱ्याची कॉन्स्टेबल बायको, नायब तहसीलदारावर जीव जडला, नाल्यात मृतदेह आढळला

राष्ट्रवादीच्या आमदाराच्या सुरक्षारक्षकाची आत्महत्या, गडचिरोलीत पोलीस जवानाचे टोकाचे पाऊल

मुलीच्या आत्महत्येनंतर सहा महिन्यांनी मृतदेह सापडला, बापाने जंगलात पुरला, पोलिसांनी दोन वर्षांनी उकरला

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.