प्रेमवीर ‘शाहरुख’ची गर्लफ्रेण्डसाठी बाईकचोरी, प्रेमभंगानंतर दारु-गांजाच्या आहारी

आपल्या प्रेयसीची मागणी पूर्ण करण्यासाठी चोरी करण्याकडे वळला असल्याचे त्याने सांगितले आहे. आपल्या प्रेमापोटी, प्रेयसीला महागड्या किमतीच्या आणि आकर्षक वस्तू भेट देण्यासाठी तो चोरी करायचा

प्रेमवीर 'शाहरुख'ची गर्लफ्रेण्डसाठी बाईकचोरी, प्रेमभंगानंतर दारु-गांजाच्या आहारी
बुलडाण्यात बाईक चोर अटकेत
Follow us
| Updated on: Feb 16, 2022 | 1:10 PM

बुलडाणा : प्रेमात आणि युद्धात सर्व काही माफ असतं, असं आपण बऱ्याचदा ऐकत असतो. मात्र बुलडाणा (Buldana Crime) जिल्ह्यातील तरुणाने प्रेयसीच्या प्रेमापायी आणि तिचे लाड पुरवण्यासाठी चक्क चोऱ्या करण्याचा मार्ग अवलंबला असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रेमात ‘याड’ लागलेल्या या तरुणाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तर त्याच्या सहकाऱ्यांनी देखील मौजमजा करण्यासाठी अनेक चोऱ्या (Bike Theft) केल्याचं समोर आलं आहे. 12 फेब्रुवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दुचाकी चोरणाऱ्या चार युवकांच्या मुसक्या शेगाव शहरातून आवळल्या होत्या. त्यांच्याकडून दुचाकीसह लाखोंचा मुद्देमाल जप्त केला होता. या आरोपींच्या चौकशी दरम्यान शेख शाहरुख शेख फिरोज याने अत्यंत धक्कादायक माहिती दिली आहे.

काय आहे प्रकरण?

आपल्या प्रेयसीची मागणी पूर्ण करण्यासाठी चोरी करण्याकडे वळला असल्याचे त्याने सांगितले आहे. आपल्या प्रेमापोटी, प्रेयसीला महागड्या किमतीच्या आणि आकर्षक वस्तू भेट देण्यासाठी तो चोरी करायचा, त्यामुळे प्रेमात सर्व काही माफ असतं हा गैरसमज पोलिसांनी खोडून काढला. तर इतर तरुणांनी आता ही घटना पक्की लक्षात ठेवणे अतिशय गरजेचे आहे.

ब्रेकअपनंतर ड्रग्जच्या आहारी

हा तरुण एवढ्यावरच थांबला नाही. काही दिवसानंतर प्रेमभंग झाल्याने तो चोरीसह, दारू, गांजा, जुगार याच्या व्यसनाधीन झाला, अशी कबुली त्याने स्वतः दिली आहे. स्थानिक गुन्हे शाखेने अटक केलेले शेख शाहरुख शेख फिरोज, शेख मोबीन शेख हरून, अमान खान असलम खान, मुंसिफ खान अल्ताफ खान हे चारही आरोपी प्रतिष्ठित कुटुंबातील असल्याचे चौकशीतून समोर आले आहे.

यातील शेख शाहरुख हा प्रेमात पुरता बुडाल्याने प्रेयसीला आकर्षित करण्यासाठी महागडी दुचाकी, तेवढाच महागडा मोबाईल, आणि उच्च प्रतीचे कपडे परिधान करण्याची त्याला हौस जडली होती. ही त्याची जीवनशैली जपण्यासाठी त्याने चोरी करणे हा एकमेव मार्ग निवडल्याचे निष्पन्न झाले आहे.

शेताच्या बांधावरुन दुचाकी लंपास

हे चारही तरुण शेतकऱ्यांच्या शेताच्या बांधावरुन दुचाकी लंपास करत होते. या दुचाकी विकत घेणाऱ्या व्यक्तींच्या कुंडल्या देखील स्थानिक गुन्हे शाखेने काढल्या आहेत. त्यांना लवकरच अटक केली जाणार असल्याची माहिती आहे. आतापर्यंत पोलिसांनी यातील सहा जणांना बेड्या ठोकल्या आहेत, त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांसोबत सुसंवाद ठेवून त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवणे अत्यंत गरजेचे झाले आहे.

संबंधित बातम्या :

दादा मला एक ‘पल्सर’ आण, एकुलत्या एक बहिणीची इच्छा, भावाचा बाईक चोरीचा सपाटा

फॅशन डिझायनरने विणलं बाईक चोरीचं जाळं, चार दुचाकींची ऑनलाईन विक्री, एका मेसेजमुळे भांडाफोड

यूट्यूबवरून प्रशिक्षण घेत चोरी, दिंडोशी पोलिसांना टीप लागताच खेळ संपला; दुचाकी चोरणाऱ्या टोळीच्या थेट मुसक्या आवळल्या

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.